उन्हाळी सुट्टी पुस्तकांशी गट्टी उपक्रमातील 40 उत्कृष्ट बालवाचकांचा गौरव.

वाचन संस्कृती रुजविण्यासाठी एच ए आर सी चा स्तुत्य उपक्रम

उन्हाळी सुट्यात मोबाईलशी कट्टी व पुस्तकांशी गट्टी करत सर्वात जास्त पुस्तके वाचून त्याचे परिक्षण करणाऱ्या 40 उत्कृष्ट बालवाचकांचा 4 ऑगस्ट सोमवार रोजी मंठा तालुक्यातील हेलस येथील जिल्हा परिषद शाळेत होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एच ए आर सी) संस्थेतर्फे सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एच ए आर सी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, तर प्रमुख अतिथी म्हणून विस्तार अधिकारी के.जी.राठोड, स्पर्धा समन्वयक प्रकाश डूबे, मुख्याध्यापक रमेश खुडे हे मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना समन्वयक प्रकाश डूबे यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांनी मोबाईलची कट्टी करत वेळेचा सदुपयोग करून वाचन करावे, ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजावी म्हणून या स्पर्धेचे आयोजन संपूर्ण मराठवाड्यात करण्यात आल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. पवन चांडक यांनी एच ए आर सी संस्था राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमावर माहिती दिली तसेच हे सर्व उपक्रम लोकसहभागातून होत असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना वाचन गोडी लागावी म्हणून आतापर्यंत 160 शाळांना प्रत्येकी शंभर पुस्तकांची आनंदी वाचन पेटी भेट देण्यात आल्याचे सांगितले. शिक्षण विस्तार अधिकारी के.जी राठोड यांनी जालना जिल्ह्यात हा उपक्रम प्रत्येक शाळेत राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तसेच प्रत्येक शाळेत आनंदी वाचन पेटी देता यावी म्हणून दात्यांनी आर्थिक सहयोग देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज भरडे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा समन्वयक उदय उज्जैनकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा समन्वयक उदय उज्जैनकर, दत्तात्रय राऊतवाड, कल्पना वानरे, अनिल देशमुख, नारायण राठोड, अविनाश खनके, गवई सर, तुळशीदास जामदार,परसराम टकले सर, अनिल देशमुख,विकास दाहिजे आघाव सर, अविनाश लोमटे, सत्वशीला झाटे, संजय राक्षळे, रमेश सोनुनकर सविता कोकाटे, वर्षा गायकवाड मारुती खनपटे, देविदास राठोड यांनी परिश्रम घेतले.


वाचनप्रेमी शिक्षकांचा सन्मान

उन्हाळी सुट्टीत शाळेत जाऊन मुलांसाठी ग्रंथालयातील पुस्तके उपलब्ध करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मानपत्र व ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला.


जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील मंठा, परतुर , बदनापूर अंबड, जालना या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा या उपक्रमात सहभाग होता. यावेळी शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.


 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल