स्वराज्य वार्ता प्रतिनिधी किरण पाटील
सध्या श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यात महादेवाची पूजा व आराधना केली जाते. श्रावण महिन्याचे औचित्य साधत मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कावड यात्रा काढण्यात आली. हे कावड यात्रेचे तिसरे वर्ष आहे ही कावड यात्रा बजरंग चौकातून काढण्यात आली ही कावड यात्रा बजरंग चौकातून निघून तापी नदीवर नेण्यात आली तापी नदीवर तापी नदीची व कावड ची पूजा करण्यात आली व कावड मध्ये पाणी भरण्यात आले. नंतर तापी नदीवरून कावड यात्रा गावात फिरवण्यात आली. ही कावड यात्रा बस स्टैंड वर आल्यावर हनुमान चालीसा म्हणण्यात आली नंतर ही कावड यात्रा पिंपलेश्वर महादेव मंदिर शनी मंदिर इच्छापुर रोड कडे रवाना झाली .यावेळी गावातील नागरिक तरुण वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते अशा प्रकारे कावड यात्रा संपन्न झाली.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






