सरदार जी. जी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय रावेर येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी किरण पाटील

सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय रावेर येथे शाळेच्या जेष्ठ शिक्षिका श्रीमती ए. व्ही. महाजन मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धेत विदयार्थ्यांनी सहभाग घेऊन मराठी, हिंदी तसेच इंग्रजी भाषेत भाषण केले. सदर कार्यक्रमात जेष्ठ शिक्षक श्री. जी. टी. पाटील सर व प्रमुख वक्त्या सौ. आर. पी. महाजन मॅडम यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयीं सखोल अशी माहिती सांगितली. तर अध्यक्षीय भाषणात श्रीमती ए. व्ही. महाजन मॅडम यांनी मनोगत व्यक्त करून विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास परीक्षक म्हणून सौ. पी
एस. पाटील मॅडम व सौ. एल. आर. चौधरी मॅडम लाभल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ. एन. व्ही. चौधरी मॅडम यांनी मानले.
कार्यक्रमास सर्व शिक्षक बंधू, भगिनी ,शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल