संघर्षयोद्धा मा. श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाथरी येथे भव्य रक्तदान शिबिर

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

आज शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट 2025 रोजी संघर्षयोद्धा माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अखंड मराठा समाज पाथरी तालुका यांच्यावतीने शिक्षक कॉलनी जागृत हनुमान मंदिर पाथरी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दहा वाजता अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रसंगी पाथरी तालुक्यातील बापू कोल्हे, विष्णू काळे, पांडुरंग शिंदे, तुकाराम वाघ, भागवतराव शिंदे, भाऊराव गायके, रामचंद्र आमले, अभिजीतराव आमले, प्रवीण सिताफळे, गजानन घुमरे,
पप्पू वाकणकर, तुकारामजी पौळ, प्रताप आमले, रवींद्र धर्म, पप्पू वाकणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पाथरी तालुक्यातून एकूण २२६ मराठा युवकांनी रक्तदान केले पैकी खेर्डा येथून तब्बल ३० मराठा युवकांनी रक्तदान करून सदर कार्यक्रमात सिंहाचा वाटा उचलला.
खेर्डा गावातील मुस्लिम मावळे शेख मुबारक यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान करून आम्ही जरांगे पाटला सोबत आहोत हे दाखवून दिले.
श्रीमती ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांना न्याय मिळाल्याशिवाय मी वाढदिवस साजरा करणार नाहीत असे माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील यांनी सांगितले आहे त्यामुळे युवकांनी कुठेही बॅनर न लावता रक्तदानासारखे समाजकार्य करून समाजापुढे आदर्श निर्माण करून दादांचा वाढदिवस साजरा केला.
खेर्डा येथील तरुण श्री प्रताप आमले पाटील यांनी रक्तदानानंतर 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलनासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्यासाठी युवकांना आवाहन केले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल