स्वराज्य वार्ता उपसंपादक उमेश वैद्य
परतूर तालुक्यातील लिखित पिंप्री येथील लक्ष्मण गुलाबराव कदम (वय ३५) हे त्यांच्या पत्नीच्या कानातील सोन्याचे झुंबर घेऊन सेलू येथून खत आणण्यासाठी घरून निघाले परंतू रात्री खूप उशीर झाला तरी ते घरी न आल्याने घरच्यांनी मोबाइलवर संपर्क केला असता मोबाइल बंद होता. नातेवाईकांशी संपर्क करून शोधाशोध केली ते (दि२९) मंगळवारी मिळाले नाही. त्यांचा शोध सुरू असताना (दि.३०) बुधवार रोजी चुलत सासुच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लक्ष्मण कदम हे मृतावस्थेत आढळून आले. डोक्यात दगड घालून त्यांचा खून केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आष्टी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला अधिक माहिती आशी की लक्ष्मण गुलाबराव कदम रा. लिखित पिंपरी हे शेती करुन दोन मुले ज्ञानेश्वर व समर्थ, पत्नी गोकुळा कदम, आई सीताबाई कदम यांच्यासह एकत्र राहत होते. (२९) जुलै रोजी सकाळी ते पत्नीच्या कानातील एक तोळ्याचे सोन्याचे झुंबर घेऊन सेलू येथून खत घेऊन येतो म्हणून घरा बाहेर पडले होते. रात्री उशीर झाला तरी ते घरी नाही आल्या मुळे घरच्यांनी लक्ष्मण यांची वाट पाहिली त्यांच्या फोनवर बराच वेळ फोन केल. परंतु त्याचा फोन बंद होता. रात्रीही ते घरी आले नाहीत. बुधवारी सकाळी कुटुंबीय त्यांचा शोध घेण्यासाठी शेतात गेले. तेव्हा त्यांच्या चुलत सासु बेबी नारायण कदम यांच्या शेतातील पत्र्याच्या शेड मध्ये लक्ष्मण कदम हे रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले दिसले.त्यांना लुटण्याच्या उद्देशाने कुणी तरी त्यांचे डोके ठेचून त्यांची हत्या करण्यात आली आहे या हत्याचा आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे हे करत आहे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






