शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांना विशेष सवलतीच्या दरात औषध फवारणी बॅटरी पंप वाटप

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

तालुक्यातील व्यापारी मजूर आणि शेतकरी यांच्या जीवनात सुलभता आणण्यासाठी नेहमीच शिवसेना नेते सईद खान आणि असेफ खान हे प्रयत्नशील असतात. आपल्या मतदारसंघातील लोकांना विविध समाजोपयोगी आणि शासकीय योजनेचा लाभ कसा मिळेल याकडे त्यांचे विशेष लक्ष असते.याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या वतीने शिवसेना भवन मध्यवर्ती कार्यालय पाथरी येथे शेतकऱ्यांच्या नेहमीच कामी येणारे ३००० रुपयांचे औषध फवारणी बॅटरी पंप अर्ध्या दरात म्हणजेच १५५० रुपयात तसेच शुद्ध पाण्यासाठी वापरले जाणारे १२९९९ रुपयांचे वाटर फिल्टर ४४९९ रुपयात देण्याचे काम जोरात सुरू आहे.

या योजनेचा लाभ शेतकऱ्यांसह घरगुती लोकांनी रविवार दिनांक २७ जुलै २०२५ ते शनिवार ३ ऑगस्ट २०२५ पर्यंत घेण्याचे आव्हान संबंधित कंपनी आणि पाथरी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेले आहे. वाजवी किमतीत शेती विषयक साहित्य शेतकऱ्यांना मिळत असल्याने यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.यावेळी शिवसेना नेते सईद खान आणि असेफ खान यांचे येथे जमलेले शेतकरी तोंड भरून कौतुक करताना दिसले.यावेळी जिल्हाप्रमुख नाना टाकळकर, उपजिल्हाप्रमुख बंडू पाटील ढालेगावकर, शहर प्रमुख वाहेद खान,आलोक चौधरी,अनिल ढवळे,विनोद लोहगावकर, हरिभाऊ देशमुख, ताजुद्दीन फारुकी,खालेक चाऊस, सिद्दीक पटेल,राजू मुळे,साजिद राज, गोविंदा हरकळ,नौमान अन्सारी, प्रताप शिंदे, हबीब खान इत्यादींची उपस्थिती होती.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल