तालुकास्तरीय पहिली नवोदय सराव परीक्षा संपन्न

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथूर , शिक्षणाधिकारी सुनील पोलास यांच्या संकल्पनेतून…. मार्गदर्शनातून सुरू असलेल्या मिशन नवोदय परीक्षा अंतर्गत जिंतूर तालुक्यातून जास्तीत जास्त विद्यार्थी नवोदय प्रवेशास पात्र व्हावेत या तळमळीने व एकूणच प्रत्येक विद्यार्थ्यांचा पंचकोश विकास साध्य करण्याच्या हेतूने कार्य करणारे गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांच्या मार्गदर्शनात …. जांब बु केंद्राचे केंद्रप्रमुख माधव दोसलवार नवोदय परीक्षा तालुका समन्वयक अनिल स्वामी यांच्या प्रयत्नातून दि. 30/07/2025 रोजी जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा जांब बु येथे तालुकास्तरीय पहिल्या नवोदय परीक्षेचे आयोजन करण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथुर, शिक्षणाधिकारी सुनील पोलास ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत. दर्जेदार पोषण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांचा पंचकोश विकास साध्य करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. या दृष्टीने जिंतूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले सातत्याने प्रयत्न करताना दिसून येत आहेत. मागील शैक्षणिक वर्षातही अनेक वैविध्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य करण्याचा प्रयत्न जिंतूर तालुक्यातील शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आला. याही वर्षी इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रम प्रभावी पद्धतीने राबवणे. मिशन नवोदय, मिशन स्कॉलरशिप परीक्षा, मिशन निपुण जिंतूर यासारख्या बाबीवर विशेषत्वाने नियोजनबद्ध काम सुरू आहे. या कार्याचा एक भाग म्हणून जांब बु केंद्राचे केंद्रप्रमुख माधव दोसलवार, मुख्याध्यापक सानप, नवोदय परीक्षेचे तालुका समन्वयक अनिल स्वामी आणि संपूर्ण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा जाब बु या सक्रिय टीमने सुंदर, नियोजनबद्ध प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव देणाऱ्या तालुकास्तरीय दुसऱ्या नवोदय सराव परीक्षेचे प्रभावी आयोजन केले.

या परीक्षेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन गुगल लिंक तयार करण्यात आली. या लिंक वर नोंदणी केलेल्या केंद्र शाळा व विद्यार्थी यांना व प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी उपस्थित झालेल्या सर्वांना सदर परीक्षेमध्ये सहभागी करून घेण्यात आले. सराव परीक्षेची प्रश्नपत्रिका प्रत्यक्ष परीक्षेच्या धरतीवर अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव देण्यासाठी मुख्य परीक्षेच्या पद्धतीने प्रत्यक्ष आयोजन करण्यात आले. याचा उत्तम अनुभव सर्व विद्यार्थ्यांना घेता आला. या परीक्षेत जिंतूर तालुक्यातील सर्व केंद्रामधून एकूण 232 विद्यार्थी सहभागी झाले. या परीक्षेत
1- प्रज्ञा शिवाजी गजभारे. -कडसावंगी-88.75
1-स्वराली कृष्णा सडाळ.-बेलखेडा-88.75
2-ईश्वरी बालाजी अंभुरे.-वर्णा-87.50
3-पवन मालेकर.-सोन्ना-86.25
4-भाऊराव गजानन शेळके.-
कड सावंगी. -83.75
5-रोहिणी गोपाळ भारती.
कड सावंगी. -82.50
5-आराध्या गणेश अंभुरे.-वर्णा.82.50
6-वैभवी दामोदर अंभुरे -वर्णा.-81.25
6-प्रगती जगदीप लाटे- सावंगी म्हा.-81.28
6-करण संतोष अंभुरे.-वर्णा.-81.25
या विद्यार्थ्यांनी क्रमांक मिळवला. या गुणवंत विद्यार्थ्यांचा गटशिक्षणाधिकारी त्रंबक पोले यांनी यथोचित सन्मान करून गुणगौरव करून त्यांना पुढील यशासाठी प्रोत्साहित केले. याप्रसंगी यासारख्या तालुकास्तरीय स्पर्धा प्रत्येक महिन्यात जिंतूर तालुक्यामध्ये आयोजित केल्या जाणार आहेत. या परीक्षेच्या आयोजनासाठी जांब बु केंद्राप्रमाणे सर्व केंद्राच्या टीमने पुढाकार घ्यावा. परीक्षेच्या आयोजनासाठी माझ्या वतीने आवश्यक संपूर्ण सहकार्य मी प्रत्येकाला करेल.

सदर तालुकास्तरीय परीक्षेच्या भव्य आयोजनासाठी श्री. वानारे सर श्री. अवचार सर श्री डोंगरे सर श्री स्वामी सर श्री गायकवाड सर श्री सानप सर साबळे सर गरड सर, मागीलवार मॅडम नेमाडे कांदे मॅडम मॅडम कोलते मॅडम, तरटे मॅडम, अंभोरे सर चव्हाण सर शाळा व्यवस्थापन समिती जांब यांनी मेहनत घेतली.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल