स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
कै.छगनआप्पा जाधव गोसंरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक व अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकरच्या वतीने
स्वर्गीय छगनराव साहेबराव जाधव (आप्पा)यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रतिमेचे पूजन अभिवादन करून व रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान वाटप रामकृष्णहरी अन्नदान छत्रालय सरकारी हॉस्पिटल परभणी दिनांक 29 जुलै 2025 नागपंचमी तिथी नुसार येथे करण्यात आले. याप्रसंगी नितीन महाराज गोगलगावकर यांनी असे संबोधले की वडिलांच्या पुण्यस्मरण हे अन्नदान वाटप करूनच साजरी केले पाहिजे यावेळी रामकृष्ण हरी अन्नदान छात्रालय चे संस्थापक व अध्यक्ष संकल्पक ह.भ.प गोविंद पौढे गुरुजी,वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे जिल्हाप्रमुख आयुर्वेदिक व नाडी तज्ञ डॉ गोविंद कामटे, डॉ.तेजस तांबुळे (कान,नाक,घसा तज्ञ)परभणी,मराठा सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष गोविंद इक्कर पाटील,रुग्ण हक्क संरक्षण समितीचे उपाध्यक्ष शेख सरफराज भाई,शिक्षक नितीन बुचाले पाटील सर,अन्नदानाचे यजमान राष्ट्रजन फाउंडेशनचे अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव महाराज गोगलगावकर अन्नदान व्यवस्थापक अशोक लोंढे आधी जणांची उपस्थिती याप्रसंगी बोलताना डॉ.गोविंद कामटे यांनी असे संबोधले की रुग्णांना औषध उपचार देण्या सोबतच रुग्णांना सहानुभूती,प्रेम,जिव्हाळा योग्य आहार या गोष्टीची सगळ्यात महत्वाची गरज असते आणि हे देण्याची प्रत्येक डॉक्टरचे कर्तव्य असते त्याप्रसंगी आज आप्पाच्या पुण्य स्मरणानिमित्य बॅनर बाजी इतर खर्च टाळून त्याच खर्चात त्यांनी आज रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना सकाळी नाष्ट्याची व्यवस्था केली.गोप्रेमी.कै.छगन आप्पा जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रतिमेचे पूजन अभिवादन व रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान वाटप करण्यात आले हाच प्रत्येक व्यक्तीने आदर्श घ्यायला पाहिजे इतर खर्च टाळून हा आगळावेगळा उपक्रम हिच खरी श्रद्धांजली होय…..अशी माहिती राष्ट्रजन फाउंडेशनचे प्रमुख नितीन जाधव गोगलगावक पत्रकाद्वारे दिली.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






