स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
पात्र व गरजु रुग्णांना 1 जानेवारीपासून सहा महिन्यांत 4 कोटी, 67 लक्ष रुपयांचे अर्थसहाय्य वितरीत
परभणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष हा पात्र व गरजु रुग्णांसाठी वरदान ठरला आहे. 1 जानेवारी 2025 ते 30 जून 2025 या कालावधीत या कक्षामार्फत परभणी जिल्ह्यातील 533 रुग्णांना 4 कोटी 67 लक्ष 82 हजार रुपयांची मदत वितरीत करण्यात आली. या कक्षाशी परभणी जिल्ह्यातील 29 रुग्णालय संलग्नीत आहेत,अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी व्यंकटराव इप्पर यांनी दिली.
राज्यातील नागरिकांना दुर्धर आजारांवरील उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडून आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते. यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून मदत मिळविण्यासाठी नागरिक मंत्रालयात जात असत. परंतु नागरिकांना या सेवा सहजपणे त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपलबध व्हाव्यात, म्हणून आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सध्या परभणी येथे हा कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत कार्यरत आहे.
वैद्यकीय मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी संलग्नीत परभणी जिल्ह्यातील 29 रुग्णालयांचा समावेश आहे. या निधीच्या मदतीतून गरजू व पात्र रुग्ण या रुग्णालयांत उपचार करुन घेतात. परभणी जिल्ह्यातील सदर कक्षाशी संलग्नीत रुग्णालयांची यादी पुढीलप्रमाणे आहे.
परभणी शहरातील साबू हॉस्पिटल, आर.पी. हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च हॉस्पिटल, श्री सिध्दीविनायक बालरुग्णालय/क्रीटीकल केअर सेंटर, अंकुर बालरुग्णालय, परतानी हॉस्पिटल, स्वाती क्रिटीकल केअर अँड ॲक्सीडेंट हॉस्पिटल, विघ्नहर्ता हॉस्पिटल, मौर्या हॉस्पिटल, अनन्या हॉस्पिटल, डॉ. प्रफुल्ल पाटील मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटल, स्पंदन क्रिटीकल केअर युनिट, पार्वती अंभोरे सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल, कौशल्य किडनी केअर सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल, देवगिरी सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल, परभणी आसीयु ॲण्ड ट्रामा केअर, जाधव सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल, रिम्स मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटल, जी-वन मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटल, नावंदर हॉस्पिटल, कालानी हॉस्पिटल, धन्वंतरी हॉस्पिटल, यमुना हॉस्पिटल, बालाजी हॉस्पिटल, कातनेश्वरकर हॉस्पिटल, पांडुरंग सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल, प्रसाद हॉस्पिटल, जेथलिया हॉस्पिटल, मानवत येथील मानवत मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, गंगाखेड येथील छत्रपती शाहू हॉस्पिटलचा या यादीत समावेश आहे. लवकरच परभणी शहरातील आणखी काही हॉस्पिटल योजनेत अंगीकृत होणार आहेत.
अधिक माहितीसाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष येथे संपर्क साधावा. तरी गरजू व पात्र रुग्णांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. इप्पर यांनी केले आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






