परभणीत बालहक्क व कायदे विषयक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

परभणी, दि. 24 (जिमाका) : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय व जिल्हा बाल संरक्षण कक्ष परभणी अंतर्गत महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था व महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण संस्था पुणे व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी शहरातील अंगणवाडी सेविका, बालगृह/निरीक्षण गृह कर्मचारी यांच्याकरीता बाल हक्क संरक्षण व बालका संदर्भात असणारे संपूर्ण कायदे विषयक प्रशिक्षण कार्यशाळा बुधवारी (दि. 23) संपन्न झाली.

यावेळी प्रमुख अतिथी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर श्री. बी. एम. काळे यांनी बालकाचे कायदे व अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते रवी पुराणिक सदस्य बाल न्याय मंडळ यांनी बालकांचा वैयक्तिक काळजी आराखडा या विषयावर मार्गदर्शन केले, रवींद्र कात्नेश्वरकर, बाल कल्याण समिती अध्यक्ष यांनी बालविवाह कायदा व उपाय योजना/दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन केले. अर्चना मेश्राम, बाल कल्याण समिती सदस्य यांनी ग्राम बाल संरक्षण समिती रचना व कार्य या विषयावर मार्गदर्शन केले, शेख पापा शेख विशेष वक्ते यांनी लिंग-भेदभाव व बाल व्यसनधीनता या विषयावर मार्गदर्शन केले. अंगणवाडी सेविका, बालगृह कर्मचारी, निरीक्षण गृह कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्थाचे कर्मचारी यांना सविस्तर पणे बालकांच्या कायदे व अधिकार यावर आधारित प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला बालविकास अधिकारी एम. एस.वाघमारे हे होते. सूत्रसंचालन मिलिंद कांबळे यांनी तर प्रास्ताविक जिल्हा समन्वयक चाईल्ड हेल्प लाईन संदीप बेंडसुरे यांनी केले. आभार गजानन पटवे यांनी मानले.

प्रशिक्षणाचे यशस्वीतेसाठी परीविक्षा अधिकारी मनीषा तांदळे (जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय परभणी) जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी/ कर्मचारी आम्रपाली पाचपुंजे, सोपान पतंगे, राहुल देशमुख, तसेच चाईल्ड हेल्प लाईन 1098 कार्यालय यांनी सहकार्य केले.
*-*-*-*-*

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल