छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांच्यावर हल्ला; दोषींवर कारवाईची मागणी पाथरी तालुका छावा चे तहसीलदार शंकर हदशवार व पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांना निवेदन

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

 

लातूर येथील पत्रकार परिषदेदरम्यान छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेचा निषेध करत अखंड मराठा समाज पाथरी तालुक्याच्यावतीने तहसीलदार पाथरी आणि पोलीस प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले असून, दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.दिनांक २० जुलै २०२५ रोजी लातूर येथील विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी विजयकुमार घाडगे यांनी शेतकरीविरोधी धोरणांचा आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निष्क्रियतेचा निषेध करत शांततेच्या मार्गाने प्रतीकात्मक आंदोलन केले. विधानसभेत कृषीमंत्री मोबाईलवर रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांनी अशा मंत्र्याला पदमुक्त करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी निषेधार्थ पत्ते टेबलवर टाकत आपले मत मांडले.मात्र, या प्रकाराचा राग मनात धरून राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घाडगे यांना सभास्थळीच शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना अत्यंत निंदनीय असून लोकशाहीवर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचे मत मराठा समाजाने व्यक्त केले आहे.घाडगे हे अनेक वर्षांपासून मराठा समाज आणि शेतकरी चळवळीत सक्रिय असून, त्यांच्या कार्याची दखल संपूर्ण महाराष्ट्रात घेतली जाते. अशा कार्यकर्त्यावर हल्ला होणे म्हणजे समाजद्रोह असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.अखंड मराठा समाजाने प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:सुरज चव्हाण व सहकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करावा.संबंधित आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी.लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलावीत.प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अखंड मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल