माजलगांव शहरात सुख सागर हॉटेलवर पोलिसांचा छापा

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी किसन बी पवार

माजलगांव येथील सुखसागर हॉटेल म्हणजे अवैध धंद्याचे माहेर घर

माजलगाव शहरा जवळ बायपास रोड वरील छत्रपती संभाजी महाराज चौकातील हॉटेल सुखसागर या आलिशान हॉटेलात रिसेप्शन, बर्थडे पार्ध्या पत्रकार परिषदा होतात सोबतच दारु, कॉल गर्ल, पत्याचा कल्ब चालतो अशी चर्चा आहे याकडे दुर्लक्ष केले जात होते पण माजलगाव शहर पोलीसांनी पत्याच्या कल्ब वर धाड टाकली असता यात शैक्षणिक संस्था, राजकीय नेत्यांच्या नामांकित व्यक्तींच्या मुलां विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, हॉटेल सुखसागर एक्झिक्युटिव्ह, रेस्टॉरंट & लॉजींग मध्ये मोठा पत्याचा कल्ब चालु असल्याची माहिती माजलगाव शहर पोलीसांना मिळाल्या नंतर १९ जुलै शनिवार रोजीच्या रात्री ८:३० वा छापाटाकला असता तेंव्हा तेथील रूम नं.२०१ मध्ये जुगार खेळताना नगदी ८ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसानी जप्त केले जुगार खेळारे नामे स्वप्निल अमरनाथ खुर्पे, विश्वजीत प्रताप रांजवण, पृथ्वीराज रघुनाथ शेजुळ, श्रीधर अशोक रांजवण, सिद्धेश्वर जाधव, मनोज विठ्ठल सोळंके हे शहरातील नामांकित
माजलगाव येथील संभाजी चौक येथील सुखसागर हॉटेल या ठिकाणी अनेक वेळा अवैध धंद्यांविषयक अनेक वेळा तक्रारी झालेल्या आहेत तरीपण या सुखसागर हॉटेलमध्ये या लॉजिंग मध्ये वेश्याव्यवसाय ही चालतो अशी सर्व सामान्य नागरिकात चर्चा तसेच या ठिकाणी जेवणामध्ये ग्राहकांना दिलेली खराब झालेली पनीर भाजी अशा अनेक या सुखसागर हॉटेलमध्ये तक्रारी आढळून आलेले आहेत तरी या सुखसागर हॉटेलचे मालकावरही कारवाई करण्यात यायला पाहिजे अशी नागरिकांतून चर्चा होत आहे
व्यक्तींचे मुले तीरट खेळताना रंगेहाथ पकडले. तर समजलेल्या माहिती वरुन नमुद रुममध्ये जुगार खेळण्यासाठी दररोज जुगार शौकीन लोक येतात आणि त्यात काही राजकीय व्यक्ती असतात मात्र रुम बुक करताना एकाच व्यक्तीचे आधार कार्ड घेऊन ती रुम देण्यात येते अशी माहिती व्यवस्थापक सुरेश पुजारी यांनी देऊन जबाबदारी झटकली आहे. म्हणुन सुखसागर एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट लॉजींग च्या मालका विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी शहरातील सामान्य नागरिकांनी केली असुन शहरातील काही लॉजींग, हॉटेल मध्ये अवैध धंदे सुरू असल्याचे सांगितले जात आहे त्याची माहिती कदाचित पोलीसांना असेल त्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी केली आहे. दरम्यान सुख सागर मध्ये पकडलेल्या तरुणां विरोधात पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत पण यात मोठी आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा माजलगाव शहरात एकण्यास मिळत आहे ,

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल