नखाते यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनात रंगली राजकीय व कौटुंबिक चर्चा

 


स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

 

सेलू : बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांच्या शांताई निवासस्थानी शनिवारी रात्री एक अनोखा स्नेहभोजन सोहळा पार पडला. या प्रसंगी अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खा. सुनिल तटकरे,राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या सह नेत्यांनी उपस्थिती लावली होती. या स्नेहभोजनाचं निमित्त साधून त्यांनी केवळ राजकीयच नव्हे तर कौटुंबिक विषयांवरही मोकळेपणाने संवाद साधला.
परभणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निर्धार नवपर्वचा अंतर्गत पदाधिकारी संवाद मेळावा संपल्यानंतर नेत्यांचा ताफा स्नेहभोजनानिमीत्त पाथरी येथील अनिलराव नखाते यांचा शांताई निवासस्थानी आला.याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष तथा.खा.सुनिल तटकरे,राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपालीताई चाकणकर,माजी मंत्री धनंजय मुंडे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार राजेश दादा विटेकर, आनंद परांजपे, तसेच प्रदेशचे पदाधिकारी यांचा सभापती अनिलराव नखाते, रा.काँ.महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते,आदित्य नखाते, युवक रा.काँ चे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य नखाते, डॉ.शिवप्रिया नखाते,दिपाली नखाते यांनी स्वागत केले.त्यानंतर सर्वांची स्नेहभोजन घेतले दरम्यान परभणी जिल्ह्यात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या दिग्गज नेत्यांची एकत्रित उपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला. स्नेहभोजनाचा मुळ हेतू कौटुंबिक जिव्हाळाच्या असला, तरी या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका,नगरपालिका, साठी जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर सखोल चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
या आनंददायी वातावरणात पार पडलेल्या स्नेहभोजनातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात उत्साह आणि एकजूट दिसून आली. या चर्चेचा आगामी काळात परभणीच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

▪️शांताई निवासस्थानी रंगलेल्या स्नेहभोजनात पाथरीतील प्रमुख नेत्यांच्या पक्षप्रवेशाबाबतही दिग्गज नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे.

परभणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निर्धार नवपर्वचा अंतर्गत पदाधिकारी संवाद मेळावा संपल्यानंतर नेत्यांचा ताफा स्नेहभोजनानिमीत्त पाथरी येथील शांताई निवासस्थानी आला.याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष तथा खा.सुनिल तटकरे,राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांचा सत्कार करताना रा.काँ.महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते,पाथरी सभापती अनिलराव नखाते,आदित्य नखाते, युवक रा.काँ चे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य नखाते, डॉ.शिवप्रिया नखाते,दिपाली नखाते

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल