स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
परभणी महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मनोज निलपवार, कार्यकारी अध्यक्ष श्री प्रसाद कुलकर्णी, सचिव श्री शरद बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिक्षकांच्या मागण्यांसाठी राज्यात जिल्हा पातळीवर संघटनेचे मोर्चे,, आंदोलन,निदर्शने, निवेदन देणे आदी कार्य केल्या जात आहे.
परभणी येथे मंगळवार दिनांक १६ जुलै रोजी आरोग्य वर्धिनी संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री गजानन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली योग शिक्षक पदाधिकाऱ्यांनी मागण्यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, परभणी यांच्यामार्फत मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने केली. याप्रसंगी योग शिक्षक पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली. दिलेल्या निवेदनात प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र येथे चालू असलेले योग शिक्षकांचे योगसत्रा चे कार्य पूर्वीप्रमाणेच चालू करणे, मार्च 2025 पर्यंत घेतलेल्या योगसत्रा चे संपूर्ण मानधन अदा करणे आणि महाराष्ट्र राज्यात योग आयोग स्थापन करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
योगशिक्षक संघटनेचे पदाधिकारी श्री वसंत पारवे,, सौ विद्याताई खंदारे,, श्री सुंदरदास मोरे,, श्री चंद्रकांत देशमुख,, श्री मयांक सोनटक्के,, श्री भगवान कच्छवे,, श्री भागवत बर्वे,, श्री अमोल राऊत,, सौ.आरतीताई शिंदे,,कु.शरयू यादव यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






