प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या दोषींना तात्काळ अटक करुण मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा.. भाई ॲड नारायण गोले पाटील

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी किसन बी पवार

 

अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर काल झालेल्या हल्ल्याची घटना ही खूप मोठा कट असू शकते, त्यामुळे यातील दोषी सह या कटाचा मुख्य सूत्रधार कोण आहे यांचा तपास करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावे तसेच गेल्या अनेक दिवसात महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून महाराष्ट्रात आराजक माजले आहे, राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री हे कायदा सुव्यवस्था अबाधित राखू शकले नसल्याच्या नैतिकतेतुन त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी माजलगाव यांना दिलेल्या निवेदनाद्वारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड नारायण गोले पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्र हा फुले , आंबेडकर, शाहू, कर्मवीर, क्रांतिसिंह अण्णाभाऊ यांच्या पुरोगामी विचाराचा असून याच पुरोगामी महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक विचारवंतांना गोळ्या घालून मारण्यात आले त्यात कॉम्रेड पानसरे, दाभोळकर, यांची यांचा उल्लेख करावा लागेल तर पुरोगामी विचारांचे भाजपच्या पिल्लावळींना इतके वावडे का ? असा सवाल करत, पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यावर सातत्याने होत असलेले हल्ले भारतीय जनता पक्षांच्या पिलावळी या घडवून आणत आहेत, महाराष्ट्रात पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यावर होत असलेले हल्ले पाहता फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन्मान करण्यासाठी आपल्या मुख्यमंत्री, गृहमंत्री पदाचे तात्काळ राजीनामे द्यावेत अन्यथा शेतकरी कामगार पक्षाचे वतीने तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे भाई ॲड नारायण गोले पाटील यांच्यासह भाई श्रीराम शेवाळे, भाई मुंजा पांचाळ आदींनी दिला आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल