स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव
मुरबाड खेडोपाड्यातील लोकांचा प्रवास सुखकर करणारी लाल परी सध्या काही रस्त्यावर जास्त प्रमाणात धावताना दिसत नाही परिणामी खेड्यातील प्रवाशांना प्रवास करता वेळेस खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. सदर गोष्टींकडे लक्ष केंद्रित करण्या साठी मुरबाड कल्याण प्रवासी संघाच्या वतीने १३/०७/२०२५ मुरबाड बस आगाराचे व्यवस्थापक आणि प्रशासन यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये मुरबाड कल्याण बस फेऱ्यांमध्ये वाढ करावी, प्रवाशांना इलेक्ट्रिक बस सेवा लवकरात लवकर सुरू करावी, प्रवासाच्या दृष्टीने सुस्थितीत असणाऱ्या बस सोडाव्यात, कल्याणच्या प्रेम ऑटोपर्यंत बसफेऱ्या सुरू कराव्यात, मुरबाड तालुक्यातील बंद असलेल्या बस फेऱ्या सुरू कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत अनेक वर्ष अनेक प्रवासी दररोज मुरबाड कल्याण असा जीवघेना प्रवास करत आहेत, मात्र सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी 5 ते 9 वाजेच्या दरम्यान या प्रवाशांची अवस्था फार वाईट होत आहे .बसची उपलब्धता कमी असल्यामुळे प्रवाशांची अवस्था दयनीय होत असते. कधी कधी प्रवाशांना गाडी सुद्धा मिळत नाही, झुंबड उडालेली असते. मुरबाड कल्याण बस आगाराच्या अनेक जुन्या गाड्या मध्ये बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मुरबाड कल्याण इलेक्ट्रिक बस सेवा लवकर सुरू करावी, गर्दीचा विचार करता प्रेम ऑटो ते मुरबाड अशी बस फेरी सुरू करावी तसेच मुरबाड तालुक्यातील आदिवासी भागात, खेड्यापाड्यात जाणाऱ्या बस आणि फेऱ्या ज्या बंद केल्या आहेत त्या पुन्हा पूर्ववत सुरू कराव्यात अशीही मागणी मुरबाड कल्याण बस प्रवासी संघाच्या वतीने करण्यात आली आहे . दिलेल्या निवेदनानुसार जर समस्या सोडविल्या नाहीत तर पंधरा दिवसात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी मुरबाड कल्याण प्रवासी संघाच्या वतीने देण्यात आला आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






