आष्टी:- महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिष्यवृत्ती स्पर्धेत यशस्वी झालेले ज्ञानसाधना गुरुकुल व ला. ब. शा. विद्यालय आष्टीचे विद्यार्थी कु. सार्थक काशिनाथ मिठे, कु. गौरी घेंबड, कु. शुभम बान या विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून N.M.M.S. परीक्षेत कु. प्रज्वल आघाव तर नुकताच c.a. परीक्षेत पास झालेला विद्यालयाचा विद्यार्थी शुभम मुंदडा या विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य श्री. राजेश नवल सर, उपमुख्याध्यापक श्री. जगताप सर, पर्यवेक्षक श्री. धोंडगे सर आणि पालकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानसाधना गुरुकुलाचे संचालक पी. डी. सोळंके सर यांनी मार्गदर्शन केले तर स्पर्धा परीक्षा ऑनलाईन प्रक्रियेबद्दल श्री. बालाजी मोटे सरांनी मार्गदर्शन केले. आपल्या यशाचा मंत्र म्हणजे अभ्यास हाच असल्याचे मत c.a. shubham मुंदडा यांनी बोलून दाखवले.
सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. मोहन सोळंके सर यांनी तयारी केली तर कैलास शेळके सर यांनी सूत्र संचलन केले. कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या सर्व सहकारी शिक्षकांनी मेहनत घेतली.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






