स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
अक्कलकोट येथे दिनांक १२ जुलै रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड, कायरतापूर्ण आणि पूर्वनियोजित हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज दि. १४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे पुरोगामी संघटनांनी एकवटत संतप्त आक्रोश सभा घेतली.या हल्ल्याचा निषेध करताना जमलेली शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी, घोषणांनी परिसर दणाणून गेली यावेळी बोलताना कॉम्रेड माधुरीताई शिरसागर म्हणाले”प्रवीण दादांवर हल्ला म्हणजे पुरोगामी विचारांवर हल्ला!”
हल्लेखोरांना अटक झालीच पाहिजे
“सहन करणार नाही, आता निर्णायक लढा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते म्हणाले
मा. प्रवीण दादा गायकवाड गेल्या तीन दशके मराठा–बहुजन समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आंतरराष्ट्रीय प्रगतीसाठी कार्यरत असून, हजारो विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षण आणि नोकरी मिळवून देणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. अशा समाजप्रबोधन करणाऱ्या नेतृत्वावर काळे फासणे, साई फेकणे आणि मारहाण करणे ही लोकशाही आणि पुरोगामी विचारसरणीवरच घृणास्पद आणि कट्टर हल्ला आहे!महानगराध्यक्ष गजानन जोगदंड म्हणालेया पार्श्वभूमीवर, मा. प्रवीण दादा गायकवाड यांना ‘Z+ सुरक्षा’ तात्काळ देण्यात यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा जीव धोक्यात असून, राज्य व केंद्र सरकारने त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे.सभेचे आयोजक आणि संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष नितीन देशमुख यांनी जोरदार शब्दांत सरकारला इशारा देत सांगितले हा हल्ला एका व्यक्तीवर नाही, तर समाजाच्या अस्मितेवर आहे. आम्ही केवळ हल्लेखोरांचा नाही, तर त्यांना खतपाणी घालणाऱ्या, पुरोगामी कार्यकर्त्यांना वापरून सोडणाऱ्या राजकीय पक्षांचा देखील तीव्र निषेध करतो.
महाविकास आघाडीने आमचा वापर केवळ मतांसाठी केला. आज ते आमच्या सुरक्षेच्या आणि अस्मितेच्या प्रश्नावर गप्प का?हा इशारा आहे — आता पुरोगामी समाज गप्प बसणार नाही. निर्णायक संघर्ष उभा राहणारच!”या सभेला संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख बालाजी मोहिते, महानगर प्रमुख गजानन जोगदंड, मराठा सेवा मंडळाचे जिल्हाप्रमुख गोविंद इक्कर व मंगेश भारकड, संभाजी सेनेचे विठल तळेकर, मराठा प्रवाह समन्वय समितीचे धाराजी भुसारे, शिवमुद्रा संघटनेचे सूर्यकांत मोगल, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप गव्हाणे, यांच्यासह अनेक पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.कॉम्रेड कीर्तीकुमार बुरांडे, कॉम्रेड माधुरीताई क्षीरसागर, शेतकरी संघटनेचे किशोर ढगे, प्राचार्य मोहन मोरे, अँड. प्रीती घुले, दिनकर गरुड, आशिष वाकोडे, पांडुरंग शिंदे, सिद्धेश्वर कदम, नितीन जाधव, राजू शिंदे, गजानन देशमुख, स्वप्नील गरुड, प्रकाश जाधव, सचिन काळे, एकनाथ मोरे, पवन शिंदे, उमेश देशमुख, शिवाजी कदम आणि विविध पुरोगामी संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, महिला कार्यकर्त्या आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रशासनाकडे हल्लेखोरांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा, संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!







