स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
महापुरुषांच्या विचारावर चालणाऱ्या संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनेच्या नेत्यांवरती शाई फेक होत असेल तर महाराष्ट्रा या पुरोगामी राज्यातील सामाजिक क्षेत्रातील चळवळी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या फळी कसे शांत बसणार शाही फेकुन प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासले हि दुर्दैवी घटना लोकशाही ला काळीमा फासणारी घटना असल्याचे मत लोकश्रेय मित्र मंडळा चे संस्थापक अध्यक्ष तथा लोकश्रेय न्यूज चे संपादक सलीम इनामदार यांनी व्यक्त केले
संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड हे
मराठा ओ बी सी चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन मार्गदर्शक करणारी व्यक्ती वर असे कृत्ये होत असतील तर सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांचे काय होईल अशा तिखट व तिवृ शब्दात लोकश्रेय मित्र मंडळा चे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी प्रसार माध्यमा कडे या घटनेचा निषेध व्यक्त केलाआहे
गायकवाड हे अक्कलकोट येथील नियोजित कार्यक्रमासाठी येत असतानांच त्यांच्यावरती काही अविचारी तरुणांनी शाई फेक केली त्यांच्या तोंडाला काळं फासलं हे या तरुणांनी त्यांच्याकडे महापुरुषांचा विचार नसल्यामुळे हे कृत्य केले आहे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांचे नाव घ्यायचं आणि वाटेल तशी त्यांच्या विचाराची मांडणी करायची हे अतिशय बेजबाबदार पणाचं लक्षण आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत संभाजी ब्रिगेडने महापुरुषांच्या विचारा ची कोणी मोडून तोडून मांडण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसे उत्तर दिलं आहे या पुढच्या काळामध्ये सुद्धा संभाजी ब्रिगेड त्याच पद्धतीने महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु अक्कलकोट मधील त्या तरुणांना कदाचित संभाजी ब्रिगेडच्या विचाराचा अंदाज नसल्यामुळे आणि काही अविचारी लोकांच्या विचारांना ते तरुण बिघडले असल्यामुळे प्रवीण गायकवाड यांच्यावरती त्यांनी शाई फेकण्याचा अनाठायी प्रयत्न केला आहे या सर्व कृत्याचा लोकश्रेय मित्र मंडळ निषेध व्यक्त करत आहे त्या तरुणांनी संभाजी ब्रिगेडच्या विचाराची आतापर्यंत समाजामध्ये झालेले प्रबोधन समाजामध्ये झालेली जनजागृती याचा देखील विचार करावा असं आम्ही त्यांना आवाहन करतोय या पुढच्या काळात संभाजी ब्रिगेड महापुरुषांच्या विचारांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत जनजागृतीवर पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!







