प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध; झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

 

आज दिनांक 14 जुलै 2025 रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडसह विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने एकजूट होत प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड आणि कटकारस्थानपूर्वक हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आणि प्रशासनाला निवेदन देण्यात आले.प्रवीण दादा गायकवाड हे मागास, वंचित, शोषित घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे, पुरोगामी विचारांचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक आंदोलनांना दिशा मिळाली आहे. अशा नेतृत्वावर झालेला हल्ला केवळ त्यांच्यावर नाही, तर पुरोगामी विचारसरणी आणि लोकशाही मूल्यांवरच हल्ला आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

निवेदनात प्रशासनाकडे पुढील मागण्या करण्यात आल्या:

1. प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याची तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.

2. त्यांच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेता त्वरित Z+ सुरक्षा पुरवण्यात यावी.

3. पुरोगामी नेतृत्वाला गप्प बसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात.

 

संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख बालाजी मोहिते, महानगर प्रमुख गजानन जोगदंड, मराठा सेवा मंडळाचे जिल्हाप्रमुख गोविंद इक्कर व मंगेश भारकड, संभाजी सेनेचे विठल तळेकर, मराठा प्रवाह समन्वय समितीचे धाराजी भुसारे, शिवमुद्रा संघटनेचे सूर्यकांत मोगल, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप गव्हाणे, यांच्यासह अनेक पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.कॉम्रेड कीर्तीकुमार बुरांडे, कॉम्रेड माधुरीताई क्षीरसागर, शेतकरी संघटनेचे किशोर ढगे, प्राचार्य मोहन मोरे, अँड. प्रीती घुले, दिनकर गरुड, आशिष वाकोडे, पांडुरंग शिंदे, सिद्धेश्वर कदम, नितीन जाधव, राजू शिंदे, गजानन देशमुख, स्वप्नील गरुड, प्रकाश जाधव, सचिन काळे, एकनाथ मोरे, पवन शिंदे,उमेश देशमुख, शिवाजी कदम आणि इतर प्रतिनिधी उपस्थित होते.या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला कळविण्यात आले की, पुरोगामी नेतृत्वावरील हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी लढा अधिक तीव्र केला जाईल.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल