स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
मानवत : येथील संत शिरोमणी गुरु रविदास महाराज सभागृहाचे कामाचा प्रारंभ युवानेते डॉकटर अंकुश लाड यांच्या विशेष प्रयत्नातून झाला असून काम प्रगतीपथावर सुरू असल्याने चर्मकार समाजातील नागरिक आनंद व्यक्त करत आहेत.
माजी नगराध्यक्ष एस. एन. पाटील व राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांनी या सभागृहासाठी युवा नेते डॉक्टर अंकुश लाड यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली होती या मागणीची दखल घेत डॉक्टर अंकुश लाड यांनी विशेष प्रयत्न करून शासनाकडून निधी आणून संत शिरोमणी गुरु रविदास महाराज सभागृह जिजाऊ नगर मानवत येथील वार्ड क्रमांक ९ मध्ये बांधकाम सुरू केले आहे आज दिनांक ११ जुलै २०२५ शुक्रवार रोजी सभागृहाच्या छत भरणीचा कार्यक्रम युवा नेते डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला या वेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने डॉ.अंकुश लाड यांचा शाल श्रीफळ हार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून सन्मान करण्यात आला, व समस्त चर्मकार समाजाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले, यावेळी उपस्थित नगराध्यक्ष प्रा. एस.एन. पाटील सर , राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे, सचिन विलास पतंगे, नारायण पानझाडे, छगनभाऊ नांदुरे, रामकिशन पानझाडे, केरबाजी कांबळे, शिवाजी शिंदे, सुभाष पानझाडे, रमेश ठोंबरे, लक्ष्मणराव पानझाडे, अर्जुन ठोंबरे, महादू पानझडे, परमेश्वर ठोंबरे, चर्मकार समाजातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






