स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव
कल्याण टिटवाळा शालेय नवीन वर्ष सुरू होते ना होते तर अनेक विद्यार्थी आपल्या शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी शाळेमध्ये प्रवेश घेत असतात. अनेक पालक आपल्या पाल्यांना महानगर पालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश घेतात परंतु काही शाळा पटसंख्या अभावी प्रवेशा अभावी मरणासन्न अवस्थेत आहेत कारण सरकारी शाळेतील शिक्षणाचा खालवलेला दर्जा व इमारतींची खालवलेली परिस्थिती आणखीन एक भर म्हणजे शाळेभोवती असलेले घाणीचे साम्राज्य असाच काही प्रकार मांडा टिटवाळा पश्चिम येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय महानगरपालिका शाळा क्रमांक. ६० येथे निदर्शनास आला आहे. सदर शाळेला कुठलीही संरक्षण भिंत नसून अनेक शैक्षणिक वर्ग खोल्या असून अनेक मुली व मुले शाळेत शिक्षण घेत आहेत शालेय परिसरात बाजूला मोकळी जागा असून परिसरातील लोक हे शाळेच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत ओला कचरा सुका कचरा टाकत असतात तसेच उघडी गटारे असल्यामुळे डास व दुर्गंधी मुळे मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे जरी कल्याण डोंबिवली महानगरपालिका रोज सकाळी कचरा उचलत असली तरी पूर्ण दिवस साठलेला कचरा हा मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण करू शकतो. परिसरातील माणसांना कचरा कुंडीचा पर्याय नसल्या मुळे लोक मोकळ्या जागेत कचरा टाकतात सदर कचरा अस्तव्यस्त पसरून शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. महानगर पालिकेने लोकांना कचरा कुंडी ची सोय करून द्यावी नाहीतर तिथे कचरा टाकणाऱ्या व्यक्तीस दंड दिला जाईल असे फलक महानगरपालिकेने लावावेत त्याने शाळेतील विद्यार्थी व परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






