ब्राईट इंग्लिश शाळेत विठ्ठल नामाचा गजर

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी हनुमंत दवंडे

येथील ब्राईट स्टार इंग्लिश शाळेत देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई तसेच वारकऱ्यांची वेश परिधान करून शाळेपासून दिंडीची सुरुवात करण्यात आली. मा. आमदार सुरेशकुमार जेथलिया व त्यांच्या पत्नी मा. नगराध्यक्ष विमलताई जेथलिया यांनी विठ्ठलाच्या पालखीचे पूजन केले .त्यानंतर दिंडी मोंढा भागातून बालाजी मंदिराला भेट दिली .त्यानंतर मुख्य रस्त्यावर दिंडीसाठी गेहलोत परिवाराने सर्व वारकऱ्यांना शरबत वाटप केले व पालखीची पूजा केली ,त्यानंतर पालखी महादेव चौकातील मंदिरात गेली ,याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम चे पथक टाळ मृदंग वाजवत दिंडी पूर्ण केली ,याप्रसंगी शाळेच्या संचालिका श्रीमती योगिता मनवर ,शाळेचे मुख्याध्यापक गणेश शिंदे ,सर्व सहशिक्षक श्रीमती शिंदे मॅडम ,श्री पवार सर, श्री डावखर सर, डावखर मॅडम ,कार्तिका ताजी मॅडम, पूजा मॅडम ,आरती मॅडम ज्योती मॅडम ,मोरे मॅडम,लक्ष्मीबाई ,साठे मामा नंदू, इत्यादींनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल