देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी हनुमंत दवंडे

दिनांक सहा जुलै 2025 वार रविवार रोजी येथील देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त शाळा ते विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम शाळेचे संचालक संतोष चव्हाण सुबोध चव्हाण व संचालिका श्रीमती भाग्यश्री चव्हाण यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई चे पूजन करण्यात आले.
या दिंडीत पाणी आडवा पाणी जिरवा, लेकवाचवा देश वाचवा, गुटखा तंबाखू चे सेवन करू नका, एक मूल एक झाड, नखे कापा बोटाची नाही होणार व्याधी पोटाची या व अशा अनेक पोस्टर्स झळकत होते. या पोस्टरद्वारे पर्यावरण रक्षण, स्त्री भ्रूण हत्या, आरोग्य, पाणी ही काळाची गरज, लोकशाही इत्यादीचा संदेश या दिंडीतून परतूर करांना देण्यात आला.
शाळेच्या मैदानातून दिंडीला सुरुवात झाली. टाळ, मृदुंग, चिपळ्या, लेझीम, तुळशीमाळा, तुळशी वृंदावन, विना, पताका घेऊन हे चिमुकले वारकरी कोणी संत तुकारामाच्या वेशभूषेमध्ये तर कोणी वारकऱ्याच्या वेशभूषांमध्ये तर कोणी श्री विठ्ठल रुक्मिणी रुक्मिणीच्या वेशभूषेमध्ये परतूर करांचे लक्ष वेधून घेत होते. या दिंडीत गोल रिंगण झाले हे गोल रिंगण , फुगड्या उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
शाळेत परतल्यावर सर्व चिमुकल्यांना उपवासानिमित्त केळी व फला हाराचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे संचालक संतोष चव्हाण, सुबोध चव्हाण, संचालिका भाग्यश्री चव्हाण भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रदीप चव्हाण , राजेश कार्लेकर ,गजानन कुकडे शाहीर मुजावर ,रमेश कदम विजय भापकर ,सतीश पितळे प्रदीप साळवे, सुशांत काकडे , सचिन चव्हाण अनिल जईद, सुलेमान सय्यद , वंदना ककरीय, स्वाती काळे, दिपाली वाघमारे शिबा काजी अश्विनी डोंबाळे, सबा खतीब, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल