स्वराज्य वार्ता प्रतिनिधी किसन बी पवार
केसापूरीत हजारो भाविक केशवराजाच्या चरणी नतमस्तक धाकटी पंढरी चे घेतले दर्शन भाविकांची अलोट गर्दी
माजलगाव शहराजवळ केसापुरी येथे पंढरी समजल्या जाणाऱ्या केशवराज मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त येथे लाखो भाविकांनी घेतले दर्शन. पंढरपूरच्या विठ्ठल दर्शना इतकेच केशवराज दर्शनालाही मराठवाड्यात धार्मिक महत्त्व आहे. सकाळपासून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जय घोषणा टाळ मृदंग राजा गजरात परिसर होता. आषाढी एकादशीपासून सुरू झालेला हा यात्रा उत्सव पुढील पाच दिवस म्हणजे पौर्णिमेपर्यंत उत्साहात साजरा होणार आहे या काळात किर्तन भजन महाप्रसाद विविध धार्मिक विधी तसेच रात्री जागराच्या आयोजन करण्यात येत आहे वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासन व स्वयंसेवी संस्थांनी वाहतूक सुरक्षा पाणी व आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिले आहेत . कोणत्याही अनुसूचित घडू नये प्रकाराला आळा बसावा म्हणून योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने केसापुरी गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांच्या उपस्थित मुळे परिसर भक्ती रसात नहालेला दिसून आला. केशव राजाच्या चरणी अर्पण केलेली अ प्रतिम भक्ती भाविकांसाठी अध्यात्मिक समाधान देणारी ठरली. काल संपूर्ण भारतात आषाढी एकादशी मोठ्या हर्षला साजरी केली. आषाढ महिन्यात येणाऱ्या या एकादशीला हिंदू धर्मात अन्य असा साधारण महत्व आहे यात मुहूर्तावर पंढरपूर येथील विठ्ठलाच्या पायी भारताच्या काणे कोपऱ्यातून लाखो भावी येत असतात अशीच महिमा लाभले तीर्थक्षेत्र म्हणून माजलगाव तालुक्यातील केसापुरी हे गाव पालखी मार्गावर बसलेले आहे याच गावच्या भगवान केशवराज यांचे नाव लौकिक आहे ज्या भाविकांना पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाता आले नाही ते फक्त मोठ्या श्रद्धेने आणि भक्ती भावाने या ठिकाणी येत असतात. दरवर्षीप्रमाणे केसापुरी येथे दिंडीला गेलेले भावी भक्त पंढरपूर येथून आषाढी एकादशी करून वादळ सोडून काला घेऊन येतात. केसापुरी येथील चाळीस वर्षापासून दिंडी आहे श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या रथामागे दिंडी क्रमांक 3. आहे. येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे केसापुरी ग्रामस्थ च्या तर्फे गैरसोय होऊ नये याची काळजीपूर्वक दक्षता घेतलेली आहे… सरपंच भारत आबा साबळे अविनाश साबळे अशोक सोळंके गोपी पवार सचिन जाधव संतोष म्हात्रे सर अनिकेत जोगडे व सर्व केसापुरी ग्रामस्थ मंडळी
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






