स्वराज्य वार्ता प्रतिनिधी किसन बी पवार
मराठी चित्रपटसृष्टीत अवघ्या काही वर्षांच्या कारकिर्दीत निवडक पण दर्जेदार चित्रपटांचे लेखन, दिग्दर्शन करणारे सोलापूरचे भूमिपुत्र असलेले अल्ताफ दादासाहेब शेख यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटावर पुरस्कारांचा वर्षाव अजूनही सुरूच आहे. नुकतेच त्यांना या चित्रपटासाठी नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल सिल्वर स्क्रीन फेस्टिवल आणि भारती विद्यापीठ एज्युकेशनल कॅम्पस यांच्या वतीने उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात दिग्दर्शक अल्ताफ शेख यांना कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटासाठी नीता सिंग, दिल्लीचे अनुप गुप्ता यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एम.एन. होडा, बिजेंद्र चौहान, जितेंद्र सिंग शंटी जी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नीतू सिंग यांनी केले. समन्वयक म्हणून कीर्ती तर सायमा शेख ज्युरी होत्या. दिग्दर्शक अल्ताफ शेख यांना कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटासाठी आतापर्यंत 40.पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. हा चित्रपट दिवंगत मंत्री तथा एकूण 11 वेळा आमदार राहिलेले आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित राहिलेले गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रपट होता. या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रात देशात आणि परदेशात ही प्रेक्षकांचा भर भराटुन प्रतिसाद मिळाला आहे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






