स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
शेतीसाठी वहिती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणा-या दलित आदिवासी कास्तकार गायरान धारकांच्या जमिनीचा एक इंच ही भाग कोणत्याही शासकीय अथवा खाजगी प्रकल्पाला हस्तगत करू दिली जाणार नाही असा सज्जड इशारा मानवी हक्क अभियान चे परभणी जिल्हाध्यक्ष पप्पुराज शेळके यांनी प्रशासनाला दिला आहे.
शासनाने गायरान जमिनीच्या संदर्भात अनेक परिपत्रक काढले परंतु त्या शासन परिपत्रकाची जिल्हा पातळीवर कार्यवाही न झाल्यामुळे अनेक गायनधारक मालकी हक्क सातबारा पासून वंचित राहिले आहेत.
पंजाब वर्सेस जसपाल सिंग या केसचा आधार घेत महाराष्ट्र सरकार व जिल्हा प्रशासन गायनधारकांना वेठीस धरण्याचे काम करत आहेत व त्या गायरान जमिनी नावे न करता त्यावर सौर उर्जा व विविध प्रकल्पासाठी या जमिनी भांडवलदाराच्या घशात घालत आहे असा आरोपही करण्यात आला.
मानवी हक्क अभियान व भीमशक्ती या संघटनेच्या वतीने आयोजित गायनधारकाच्या समस्या व त्यावर उपाय योजना बैठकीत ते बोलत होते.
सदर बैठक 6 जेलै रोजी परभणी येथील शासकीय सावली विश्रामगृह येथे संपन्न झाली. बैठकीचे अध्यक्षस्थानी भीमशक्ती संघटनेचे मराठवाडा महासचिव प्रा प्रवीण कणकुटे हे होते.
बैठकीत गायरान जमिनीची 1ई ला नोंद झालेली आहे त्यांचे प्रस्ताव सादर करणे,गायरान पिक पेरा नोंद करणे,पोट खराब कमी करणे, परभणी जिल्ह्यातील अनेक गावात दलित आदिवासी समाजाला स्मशानभूमी नसल्यामुळे दलितांचे जिवंत पणी हाल होतातच मात्र मृत्यूनंतरही त्या प्रेताचे अवहेलना होत आहे. अदी प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
दिनांक 14 जुलै 2025 रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. जर धरणे आंदोलन करून पंधरा दिवसात वरील मागण्या संदर्भात शासनाने ठोस पावले उचलली तर ठीक अन्यथा पुढील रणनीती ठरवून राज्यस्तरीय व्यापक अशी भव्य गायरान हक्क परिषद घेण्यात येणार आहे.
या बैठकीला भिमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश भिसे, मानव हक्क अभियान जिल्हा संपर्कप्रमुख मारुती साठे, सुहास पंडित, मानवी हक्क अभियान जिल्हा संघटक गणेश जोगदंड, सेलू तालुका अध्यक्ष अंकुश तांबे,अदी मान्यवर उपस्थित होते.
बैठक यशस्वीतेसाठी, दिपक कनकुटे, संजय बगाटे, राहुल जमदाडे हरिभाऊ सुतारे, बाळासाहेब नवगिरे, रमेश नितनवरे,दता नवगिरे आदींनी
परिश्रम घेतले.
सदर बैकीला परभणी जिल्हाभरातून बहुते संख्येने गायरान धारक महिला पुरुष उपस्थित होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






