स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
मानवत : साथ सोबत निवासी अस्थिव्यंग विद्यालय, मानवत येथे वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे सचिव इमरान सर होते. त्यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक, वही आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आणि वृक्षारोपणही करण्यात आले.या कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक घोरी जावेद सर यांनी केली. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व यावेळी स्पष्ट केले.शिक्षिका सोफिया मॅडम यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.साजिद सर यांनी कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानले. शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






