स्वराज्य वार्ता प्रतिनिधी बबनराव वि आराख
२० जुन २०२५ रोजी विवेक विचार मंच, महाराष्ट्र तर्फे आयोजित राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त, राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२५ नुकतीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेशन सेंटर न्यू इंदोरा नागपूर येथे पद्मश्री नामदेवराव कांबळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. परिषदेचे उद्घाटन केंद्रीय बांधकाम व वाहतूक मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे,महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री श्री संजयजी शिरसाठ व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. उद्धाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी म्हणाले की, राजश्री छत्रपती शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी मानव जातीला नवी दिशा व ऊर्जा दिली ती ऊर्जा आपण आपल्या सामाजिक कार्यामधून समाजापर्यंत पोहोचवण्याचे करावे आणि समाजाला नवी दिशा देण्याचं कार्य करावे असेही नामदार गडकरी आपल्या खास शेरो शायरीच्या शैलीत याप्रसंगी म्हणाले तसेच या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे व महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री श्री संजय शिरसाट यांनी सुद्धा याप्रसंगी शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे त्यासाठी विविध संघटनांनी योगदान द्यावे असेही मंत्री महोदय या
प्रसंगी म्हणाले याप्रसंगी श्री अतुलभाऊ शेंडे खामगाव येथील श्री माधवराव कांबळे श्री रामचंद्र घोराळे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे कार्यकारिणी सदस्य तथा उज्जैनकर यांचे साडभाऊ श्री सुनिल मुंधोकार फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हा समन्वयक तथा उज्जैनकर यांचे खामगाव येथील व्याही श्री बाळूभाऊ ईटणारे फाऊंडेशनच्या राज्य उपाध्यक्षा हिंगणघाट जि.वर्धा येथील प्रा.डॉ.मनिषाताई रिठे डॉ.उज्जैनकर यांचे व्याही अकोला येथील श्री मनोहरराव बुडूखले उज्जैनकर फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हा सहसचिव श्री शालिग्राम मानकर सर आदी उपस्थित होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






