पोलीस दलात आर्थिक संगनमताने संलग्नता परभणीतील लोकश्रेय च्या कार्यकर्त्यांचा विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवेदन

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

 

परभणी पोलीस दलातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करत आपल्या सोयीनुसार एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे कामकाज सुरू ठेवले असल्याचा गंभीर आरोप करत लोकश्रेय मित्र मंडळ महाराष्ट्र या संस्थेने विशेष पोलीस महानिरीक्षक, शहाजी उमाप नांदेड परिक्षेत्र यांना निवेदन सादर केले आहे.हे निवेदन दिनांक १ जुलै २०२५ रोजी संस्थेचे अध्यक्ष सलीम इनामदार . निवृत्ती नितनवरे आशोक उबाळे विजय पानबुडे यांचा या शिष्टमंडळात समावेश होता यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांनी सादर केले.निवेदनातील आरोपानुसार, काही पोलीस कर्मचारी गेल्या २५ वर्षांपासून विशेष शाखा, एलसीबी, पासपोर्ट विभाग, कंट्रोल रूम अशा विविध विभागांमध्ये फक्त आस्थापनेवर बदल्यांचे दाखले घेऊन प्रत्यक्षात मात्र एका जागेवरच कार्यरत आहेत. हे सर्व संगनमत करून आर्थिक देवाणघेवाणीतून घडत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.या प्रकारामुळे जिल्ह्यातील इतर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. आम्हीही पोलीस अधीक्षक कार्यालयात काम करण्यास सक्षम आहोत, मग आमच्याशी असा भेदभाव का? असा सवाल कर्मचाऱ्यांच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.या कर्मचाऱ्यांमुळेच जिल्ह्यात अवैध धंद्यांना पाठबळ मिळत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी राबवलेल्या मोहिमा फसल्याचे चित्र उभे राहिले आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.संलग्न ठेवलेले कर्मचारी तात्काळ मूळ पदावर परत पाठवावेत आणि त्यांची पदमुक्ती करण्यात यावी, अशी मागणी सलीम इनामदार यांनी केली आहे

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल