स्वराज्य वार्ता / बबनराव आरख
मौजे बुलढाणा येथे सामाजिक न्याय विभाग बुलढाणा , महाराष्ट्र शासन ,समाज कल्याण विभाग बुलढाणा व संजीवनी बहुउद्देशीय संस्था च्या वतीने राज्यश्री शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी जिल्हा अधिकारी कार्यालयापासून जिल्हा परिषद पर्यंत रॅली काढण्यात आली त्या रॅलीमध्ये लोक कलाकार ईश्वर मगर व शाहीर डी आर इंगळे यांनी आपले शाहिरी गीते सादर केली साजरीकरण केले त्या प्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे डॉ अनिता राठोड व मनोज मेरत सर इत्यादी अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डी आर माळी व शाहू फुले आंबेडकर पुरस्कार प्राप्त संस्थेचे अध्यक्ष डॉ निवृत्ती भाऊ जाधव व शाहीर मनोहर पवार साहित्यिक सुरेश साबळे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राजश्री शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले डॉ निवृत्ती जाधव यांनी शाहू महाराजांच्या जीवनावर कार्यावर आधारित मार्गदर्शन केले त्यामध्ये समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी उत्कृष्ट फोटोग्राफी करणारे प्रशांत सोनूने व कलावंत महिला इत्यादी उपस्थित होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






