स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
मानवत : सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र तर्फे राज्यस्तरीय निवेदन मोहीमेच्या आव्हानाला प्रतिसाद देत द्वेषपुर्ण वक्तव्य करुन सामाजिक सलोखा बिघडवायचा प्रयत्न करणार्या संग्राम जगताप, नितेश राणे, महेश लांडगे, गोपीचंद पडळकर व मेघा कुलकर्णी यांच्याविरोधात संवैधानिक तरतुदी नुसार दंडात्मक कार्यवाही करावी अश्या मागणीचे निवेदन मा.राज्यपाल महाराष्ट्र यांना तहसीलदार यांच्या मार्फत सकल मुस्लिम युवक मानवत जि.परभणी तर्फे देण्यात आले.
यावेळी सकल मुस्लिम युवकचे वसीम कुरेशी, महेबुब मंसूरी, वाजेद शेख, अफ़रोज़ शेख, ख़य्युम सहारा, इलियास पठाण, सईद लाला, शोएब कुरेशी, जुबेर शेख, मुख्तार शेख, मोहसिन शेख, तसेच इतर युवक उपस्थित होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






