वृक्षारोपणातून श्रद्धांजली : स्व. शिवाजी परसराम दरेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त १ हजार झाडांचे वृक्षारोपण

स्वराज्य वार्ता उपसंपादक उमेश वैद्य

दैनिक बुलंद शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर यांचा स्तुत्य उपक्रम.

स्वर्गीय शिवाजी परसराम दरेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त वझर सरकटे येथील धनेश्वर देवस्थान परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही वृक्षारोपण करण्यात आले. यंदाच्या उपक्रमात वझर सरकटे, जयपूर आणि संगमेश्वर या ठिकाणी तब्बल १ हजार विविध जातींची झाडे ३२ एकर क्षेत्रावर लावण्यात आली.

या उपक्रमासाठी टँकरद्वारे पाण्याची सुविधा करण्यात आली असून, लवकरच ठिबक सिंचन प्रणालीदेखील राबविण्यात येणार आहे. “वृक्ष जगले तर आपणही जगणार आहोत,” या तत्त्वाला अनुसरून निसर्गसंवर्धनाचा प्रेरणादायी संदेश दैनिक बुलंद शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी या उपक्रमातून दिला आहे.

स्व. शिवाजी दरेकर हे समाजात निर्भीड वागणारे, आदर्श वागणुकीचे प्रतीक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या स्मृती सदैव जपल्या जाव्यात, या भावनेतून दै. बुलंद शक्तीचे संपादक रामेश्वर दरेकर हे हा उपक्रम सातत्याने राबवित आहेत. जिवंतपणी वडिलांची सेवा केली आणि आता देखील वडिलांची आठवण चिरस्थायी जिवंत राहावी यासाठी वृक्षलागवड करत आहे असं मतं रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी व्यक्त केले आहे.

“आई-वडील हीच खरी ईश्वरमूर्ती आहेत. त्यांची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा आहे,” हा संदेशही या उपक्रमातून समाजांत देण्याचा प्रयत्न केला. जेसीबी द्वारे चार फुट खोल खड्डे तसेच अडिच फुट रुंद खड्डे खोदून वृक्षलागवड करण्यात आली.

दरेकर यांना याबाबत गावातील सर्वसामान्य नागरिकांनी भरभरून कौतुक करत वृक्षलागवड करण्यासाठी मेहनत घेतली. लाखो रुपये खर्च स्वतः दैनिक बुलंद शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी केला आहे.

धनेश्वर देवस्थान अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांचे सहकार्य लाभले नाही दरेकर यांनी व्यक्त केली खंत.

एखादी व्यक्ती जर चांगले काम करत असेल तर त्याचे मनोबल वाढवले पाहिजे. खच्चीकरण करायला नको. चांगल्या कामात राजकारण नको. 

मात्र धनेश्वर देवस्थान वझर सरकटे येथील संस्थान अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सरपंच, उपसरपंच, यांना वृक्षलागवड बाबतीत कल्पना देऊनही यांनी कुठल्याही प्रकारची मदत केली नाही. उलट या विषयात राजकारण करुन मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. धनेश्वरावर दैनिक बुलंद शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर यांची अतुट श्रद्धा आहे. महाशिवरात्री निमित्त देखील रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी दोन लाख रुपयाची विद्युत रोषणाई देवस्थानला दिली आहे. देवस्थान बाबतीत राजकारण नको मी राजकीय नेता नाही यात भावनिक सहकार्य असायला हवे. वृक्षलागवड केल्यानंतर वृक्षाला पाणी आवश्यक होतं. दुसर्या म्हणजे चांगेफळ येथुन पाणी टँकर बोलवले विद्युत पुरवठा तिनं वेळा बिघाड केली गेली. अखेर सोपान सरकटे यांच्या विहिरीवरिल इंजिन मध्ये डिझेल टाकुन सात टँकर पाणी वृक्षांना देण्यात आले. माणसं माणुसकी विसरत चालली आहे अशी खंतही रामेश्वर दरेकर यांनी व्यक्त केली. हे सर्व करुन मोठे काम केले नाही मी एक सामान्य माणूस आहे फक्त धनेश्वर नगरीला नंदनवन करायचं आहे हा दृष्टिकोन ठेवून कामं करत आहे असं दरेकर यांनी सांगितले. 

वृक्षलागवड नाही तर मरण अटळ.

तुम्ही आम्ही कोरोना महामारीत अनुभव घेतला आहे हवा किती महत्त्वाची आहे. ऑक्सीजन अभावी अनेक जणांनी आपले प्राण गमावले आहे. जर वृक्षलागवड केली नाही तर येणाऱ्या काळात आपण मरणार जगायचं असेल तर वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. आंबा नारळ काजू बादाम फणस राय जांभुळ खायला लागत पैसे देऊन विकत घेतो मात्र लागवड करित नाही. उन्हाळ्यात सावली लागते मात्र झाड लावत नाही. 

या एक हजार वृक्षांची लागवड.

धनेश्वर देवस्थान वझर सरकटे तालुका मंठा जिल्हा जालना येथे तसेच जयपूर , संगमेश्वर येथे दैनिक बुलंद शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी आपल्या वडिलांच्या पुण्यतिथी निमित्ताने वृक्षलागवड एक हजार वृक्षांची केली आहे.

यामध्ये आंबा ,नारळ , काजू , बादाम , फणस , राय जांभुळ , सप्तपर्णी , वड , पिंपळ व विविध फुलझाडांची लागवड करण्यात आली. यावेळी गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. वृक्षलागवड करण्यासाठी आलेल्या सर्वांना दोन दोन वृक्ष देण्यात आली.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल