खरेदी-विक्री संघा विरोधात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे लाक्षणिक उपोषण

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव

 

मुरबाड तालुक्यात भ्रष्टाचार फोफावत असताना पुन्हा एकदा खरेदी विक्री संघाचा भोंगळ कारभार भ्रष्टाचार उघडकीस आला आहे या भ्रष्टाचाराविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अध्यक्ष सुभाषजी बसवेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली माहिती अधिकार महासंघ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शंकरजी वडवले यांनी उपोषणाचे हत्यार उघारले आहे.
खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाची मुदत दिनांक – ०५/०६/२०२१ रोजी संपली असताना दिनांक- २९/१२/२०२४ पर्यंत कोणत्याही अधिकार नसताना तब्बल साडेतीन वर्ष बेकायदेशीर कारभार करून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. तसेच चेअरमन संचालक यांनी खरेदी-विक्री संघाच्या खात्यातून आपल्या नावे रक्कम काढून कॅशबुक मध्ये नोंद न करता
अपव्यवहार केला आहे. संघाच्या नावाने चालत असलेल्या रास्तभाव धान्य दुकानाचे कुठलेही कागदपत्रांची पूर्तता न करणे संघाच्या नावाने असलेले गाळे ९९ ते १०० रुपये भाड्याने दिल्याची दाखवून तसेच दोन गाळ्यांची नोंद न दाखवता मात्र प्रत्यक्षरीत्या हजार रुपयाची वसुली केली गेली आहे. बारदानाच्या वजना पेक्षा शेतकऱ्यांकडून वाढीव भाव घेणे तसेच सुतलीचे व हमाली चे पैसे आकारणे सातबारा मध्ये फेरफार करून भात खरेदी करणे अशा सर्व गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी मुरबाड तहसील कार्यालयासमोर माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाने दिनांक – २४/०६/२०२४ उपोषणास सुरुवात केली असून अनेक नागरिकांचा पाठिंबा सदर उपोषणास मिळत आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल