योग साधनेमुळे आनंदीमय जीवनाचा प्रवास – श्रीमती कोमल सावरे

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

जागतिक योग दिनाचे औचित्य साधून नगर परिषद कार्यालय मानवत च्या वतीने विविध ठिकाणी आज दि.21 जून रोजी योग दिन साजरा

आज जगभरात अति उत्साहात योग दिन साजरा केला जात आहे. भारतीय पूर्वजांनी पथक योग साधनेच्या माध्यमातून आनंदीमय, शांततामय व सुखकर जीवन जगण्यासाठी योगाच्या माध्यमातून अमूल्य ठेवा जतन करून ठेवलेला आहे. आज संपूर्ण जगभरात योगाची महती वाढत चालली असून नागरिकांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी व शरीर निरोगी राहण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागत आहेत. पण योगी अशी कला आहे यापासून मनुष्य एक आगळीवेगळी जीवन जगण्याची कला आत्मसात करत आहे. योगामुळे नवचैतन्य व आरोग्यमय जीवन मनुष्यास लाभते. पतंजली ऋषी यांनी योग साधनेच्या माध्यमातून आपण चांगल्या आरोग्यावरती विजय मिळू शकतो असे सांगितले. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आज नगरपरिषद कार्यालय मानवत या ठिकाणी श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद मानवत यांचा प्रमुख उपस्थितीमध्ये योग प्रणायमाचा कार्यक्रम सर्व कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आला. श्रीमती सावरे यांनी बोलताना असे सांगितले की योगामुळे आपण तणावमुक्त जीवन जगू शकतो व आरोग्य सुधारण्यास तसेच चांगले राहण्यास मदत होते यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये एक नवचैतन्य व नाविन्यपूर्ण उपक्रम यांच्या माध्यमातून प्रशासन चालविणे योग्य होऊ शकते. तसेच याचा फायदा सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या कामकाज व जीवन सुधारण्यास मदत होऊ शकते असे सांगितले.
तसेच नागरिकांनी शहर स्वच्छ राखावे व प्रशासनास सहकार्य करावे व वेगवेगळ्या सण समारंभ या प्रमुख वेळी वृक्ष लागवड करून पर्यावरणाचे संवर्धन व जतन करावे अशा आव्हान केले.

याचबरोबर नगरपरिषदेच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमास नगरपरिषद कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी यामध्ये
सय्यद अन्वर,भगवानराव शिंदे, प्रकाश हरकळ, महेश कदम, भारत पवार,श्री. पोते, भागवत भोसले,अजय उडते,महादेव बळवंते, मुंजाभाऊ गवारे ,एम.डी.पठाण, हनुमंत बिडवे,संजय रुद्रवार, राजेश शर्मा,रामराव चव्हाण, दीपक सातभाई, नारायण व्यवहारे, शेख वसीम,रवी दहे, मनमोहन बारहाते,पंकज पवार, मुंजाभाऊ डोळसे,सचिन सोनवणे, बळीभाऊ दहे, सोनाजी काळे, नारायण काळे,लईक अन्सारी, वंदना इंगोले, सुनिता वाडकर,सीमा कांची, रावसाहेब झोडपे, निवृत्ती लाड, संजय कुऱ्हाडे, सुनील कीर्तने, दीपक भदर्गे, जावेद मीर,शाम दहे, संजय नंदनवरे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल