मांडा पश्चिम आझाद नगर येथे ड्रेनेज च पाणी रहिवासी चाळींच्या मर्गीकेवर रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव

 

टिटवाळा मांडा पश्चिम येथे आझाद नगर येथे पावसाळा सुरू होतोय ना होतेय तर चेंबरचे गटाराचे पाणी नागरी वस्तीत शिरू लागले आहे. आझाद नगर येथील अनाधिकृत बांधकामामुळे सदर समस्या उद्भवले आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे. समाज सेवक राजेंद्र जाधव यांच्या म्हणण्यानुसार आजाद नगर येथे ड्रेनेज लाईन वर चाळीचे बांधकाम झाले आहे सदर बांधकामामुळे पाण्याचे मल्ल:निसरण करणारे चेंबर रूम खाली दबले असून दुर्गंधीयुक्त सांडपाणी हे आजाद नगर रहिवाशी चाळीच्या येण्या-जाण्याच्या मार्गीकेवर साचले आहे तसेच पूर्ण वस्तीमध्ये वाहत आहे. नागरिकांना डेंगू मलेरिया सारखे आजार होण्याची संभावना आहे लोकांच्या व लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ड्रेनेज लाईन वरील अतिक्रमण हटवल्या शिवाय सदर समस्येचे निराकरण होणार नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे.कल्याण डोंबिवली महानगरपालिका सांडपाणी, मल्ल:निसरण विभाग,आरोग्य विभाग सदर समस्येकडे दुर्लक्ष करत आहे अशी नागरिकांमध्ये ओरड आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल