न्यू व्यंकटेश हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार सुविधा सुरू – जनतेसाठी मोठा दिलासा

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

 

मानवत शहरातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. विठ्ठल काळे यांच्या न्यू व्यंकटेश हॉस्पिटलमध्ये आता आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही अत्यंत आनंददायी व दिलासादायक बातमी असून शहरातील व ग्रामीण भागातील गोरगरिब रुग्णांसाठी ही सुविधा वरदान ठरणार आहे.
न्यू व्यंकटेश हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक व सुसज्ज आरोग्य सुविधा उपलब्ध असून त्यात आंतररुग्ण विभाग (IPD), नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU), बालरुग्ण अतिदक्षता विभाग (PICU), लसीकरण सुविधा, फोटोथेरपी, पल्स ऑक्सिमीटर व NIBP मॉनिटरिंग, व्हेंटिलेटर सेवा, एक्स-रे मशीन, सेंट्रल ऑक्सिजन इत्यादीचा समावेश आहे.
या हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजू रुग्णांना दर्जेदार उपचार विनामूल्य मिळणार असून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह नावनोंदणी करून योजनांचा लाभ घेता येणार आहे.
संपर्कासाठी मोबाईल क्रमांक:
???? 89 83 77 69 95
???? 98 60 89 12 23
पत्ता: अमरेश्वर मंदिराजवळ, कुटे कलेक्शनच्या वर, मेन रोड, मानवत, जिल्हा परभणी.
शहरातील जनतेने या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्यू व्यंकटेश हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे….

चौकट………….

डॉ. विठ्ठल काळे यांची प्रतिक्रिया – “गरीब व गरजू रुग्णांसाठी ही सेवा म्हणजे माझी सामाजिक बांधिलकी”

या उपक्रमाविषयी बोलताना डॉ. विठ्ठल काळे म्हणाले,
“मानवत शहर व परिसरातील अनेक गरीब आणि गरजू रुग्ण आर्थिक अडचणीमुळे योग्य उपचार घेण्यात मागे पडतात. यामुळेच न्यू व्यंकटेश हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करून मोफत उपचार सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला. हे केवळ वैद्यकीय सेवा नाही, तर माझी सामाजिक बांधिलकी आहे. गरजू रुग्णांनी या योजनांचा लाभ घ्यावा व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, हीच माझी विनंती.”
त्यांनी पुढे असेही नमूद केले की,
“हॉस्पिटलमध्ये सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध असून अत्यवस्थ बालकांसाठी आवश्यक ती तत्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन हॉस्पिटलमध्येच दिले जाईल.”
डॉ. काळे यांची ही भावना व सेवा वृत्ती नागरिकांमध्ये समाधान व विश्वास निर्माण करणारी आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल