मोटार चोरी करणाऱ्या दोघांना आष्टी पोलिसांनी केले अटक

स्वराज्य वार्ता प्रतिनीधी राम राठोड

दिनांक १८/०६/२०२५ रोजी सपोनि. सुरवसे साहेब व स्टाफ हे पोलीस स्टेशन आष्टी येथे हजर असताना सायंकाळी १९.०० वाजेच्या सुमारास फिर्यादी सोमेश अशोकराव आघाव रा. वाहेगाव श्रीष्टी ता. परतुर यांनी पोलीस स्टेशन आष्टी येथे येऊन फिर्याद दिली की, त्यांची विहीरीवरील अॅक्वा मॅक्स कंपनीची ७.५ एच.पी. ची पाण्याची मोटार किंमती ३२५०० रुपयेची कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे.सदर माहितीच्या अनुषंगाने सपोनि. सुरवसे साहेब सोबत पोउपनि. चाटे, सहाय्यक फौजदार रामदास शेळके, पोलीस जमादार विजय जाधव, पोलीस अंमलदार गणेश शिदे, राणा पांढरे, शाम पांढरपोटे, भरत ढाकणे, अविनाश चव्हाण असे चौकशीकामी रवाना होऊन तांत्रिक विश्लेषनावरुन यातील संशयीत आरोपी आष्टी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन सपोनि. सुरवसे यांनी एक पथक तयार करुन आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. दिनांक १८/०६/२०२५ रोजी रात्री ०९.०० वाजेच्या सुमारास आरोपी नामे १) सखाराम देविदास निसर्गंध रा. बानेगाव ता. पाथरी जि. परभणी २) कैलास सुदाम वाघमारे रा. वाहेगाव (श्रीष्टी) ता. परतुर जि. जालना यांना चौकशीकामी ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असुन आरोपींचे ताब्यातुन गुन्ह्यातील अॅक्वा मॅक्स कंपनीची ७.५ एच.पी. ची पाण्याची मोटार किंमती ३२५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन गुन्हा दाखल झाल्यापासुन केवळ ०२ तासात तांत्रिक तपास करुन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस जमादार विजय जाधव हे करित आहेत.सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बन्सल साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चौरे साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. श्री. गणेश सुरवसे, पोउपनि. चाटे, सहाय्यक फौजदार रामदास शेळके, पोलीस जमादार विजय जाधव, पोलीस अंमलदार गणेश शिंदे, राणा पांढरे, शाम पांढरपोटे, भरत ढाकणे, अविनाश चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल