पीएम घरकुल योजनेत प्रथम हप्त्याचे वाटप रखडले; लाभार्थ्यांचा तक्रारीचा पाऊस योजना असूनही लाभार्थी हप्त्यापासून वंचित – प्रकाश भदर्गे ग्रामपंचायत सदस्य वैजोडा

स्वराज्य वार्ता  प्रतिनिधी  सुनील गायकवाड

 

पीएम घरकुल योजनेत प्रथम हप्त्याचे वाटप रखडले; लाभार्थीच्या तक्रारीचा पाऊस योजना असूनही लाभार्थी हप्त्यापासून वंचित प्रकाश भदर्गे ग्रामपंचायत सदस्य वैजोडा परतूर तालुक्यातील वैजोडा गावातील अनेक पात्र लाभार्थीना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचा पहिला हप्ता अद्याप मिळालेला नाही. या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य तथा नागरिक प्रकाश भदर्गे यांनी पंचायत समितीकडे तक्रार अर्ज सादर केला आहे. योजनेंतर्गत मंजूरी मिळाल्यानंतर प्रथम हप्ता दिला जातो, ज्यामुळे लाभार्थी घरकुलाचे काम सुरु करू शकतात. मात्र यावेळी हे वितरण रखडल्याने लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. पंचायत समिती समोर मागणीचा ठाम पवित्रा तक्रारीत अर्जदाराने स्पष्टपणे नमूद केले आहे की, वैजोडा येथील पात्र लाभार्थ्यांना अद्याप एकही हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरीत यावर निर्णय घेऊन प्रथम हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा देखील या अर्जात देण्यात आला आहे. वेळेवर वाटप न झाल्यास आंदोलनाचा इशाराप्रकाश भदर्गे यांनी सादर केलेल्या अर्जात असेही नमूद आहे की, जर हप्त्याचे वितरण तातडीने करण्यात आले नाही, तर पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल. त्यामुळे प्रशासनाला वेळेत निर्णय घेण्याचे दडपण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांमध्ये सध्या या योजनेच्या विलंबाबाबत रोष वाढत आहे. अनेक कुटुंबे घराच्या बांधकामासाठी निधीच्या प्रतीक्षेत आहेत.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल