पी एम श्री जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाख ब्रंच उर्दु पाथरी मध्ये प्रवेशो उत्सव साजरा

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

 

16 जून (पाथरी) महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग परिपत्रका प्रमाणे आज पी. एम श्री जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा बँच उर्दू पाथरी जि. परभणी मध्ये शाळा प्रवेशोत्सव खुप उत्सहाने साजरा करण्यात आले. पहिली वर्ग प्रवेश पात्र विद्यार्थीचे प्रवेश करण्यात आले. प्रवेशा साठी शाळा परिसरातले पालकांनी गर्दी केली होती
मागील वर्षी इयत्ता पाचवी शिष्यवृती परीक्षेस शाळेचे एकूण नऊ विध्यार्थी पात्र झाले होते आणि शाळा पी.एम श्री योजनेत परभणी जिल्ह्यातुन निवडण्यात आलेली एक मात्र उर्दु शाळा अस‌ल्यामुळे तसेच शाळेचे शैक्षणि दर्जा मध्ये झालेला वाढ पाहुण शहरातील पालकांचे कल या शाळे मध्ये आपले पाल्यांना प्रवेश करण्यास वाढला आहे.
मागील दोन दिवसांपासुन मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद यांनी मिळून शाळा, शाळा परिसर, सर्व वर्ग खोल्या आणि कार्यालय स्वच्छ करण्यास खुप परिश्रम केले.
आज सर्व वर्गखोल्या आणि शाळा सजावट करण्यात आली होती. तसेच शाळा व्यवस्थापन समितीची
शाळा पूर्व तयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी शाळा सुरु झाल्या नंतर नवागत विध्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. नंतर प्रभात फेरी वाजत गाजत काढली गेली.
प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्या मध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आवेस अन्सारी, उपाध्यक्ष सोहेल अन्सारी, सदस्य आरेफ अन्सारी, मौलाना कमरुद्दिन अन्सारी, नसरीन बेगम. तसेच माजी नगराध्यक्ष कलीम अन्सारी, माजी नगर सेवक नसीर सिद्धीका व इतर पालकांची उपस्थिती उल्लेखनीय आहे. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन इकबाल अन्सारी सरांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक जमील सिदीकी सरांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व शाळेचे उल्लेखनीय बाबीची ओळख पटवून दिली. या नंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मत मांडले, नंतर सर्व विर्ध्यार्थींचे स्वागत करण्यात आले तसेच सर्वांना पाठ्यपुस्तक, शाळेचा गणवेश, शुज, सॉक्स इत्यादी शैक्षणिक साहीयांचे वाटप करण्यात आले. निपुण महाराष्ट्र अभियाना अंतर्गत चावडी वाचन घेण्यात आला.
पोषण आहारांतर्गत विद्यार्थ्यांना
शाळेच्या पहिल्या दिवशी गोड पदार्थ देण्यात आले.
शाळेत या वर्षी मिशन
स्कॉलरशिप अंतर्गत सराव तासिका व परिक्षा घेण्याचे नियोजन व कार्यवाही सुरु करणयात आलेली आहे.
शाळेचे सर्व शिक्षक, फहीम सर, अब्दुल रहमान सर, अब्दुल्ला सर, अब्दुल बारी सर, फौजीया मिस, हुमेरा मिस आणि फरहा खानम मिस विध्यार्थीचे उजवल भविषय घडवण्यासाठी खुप परिश्रम घेत आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल