कल्याण शहरातील शारदा मंदिर संस्थेचा प्रवेशोत्सव साजरा नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांवर करण्यात आली पुष्पवृष्टी

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव

 

कल्याण शहरातील लाल चौकी येथील शारदा मंदिर संस्था कल्याण या संस्थेच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचा शैक्षणिक वर्ष २०२५/२६ चा प्रवेशोत्सव १६ जून २०२५ रोजी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. ठाणे जिल्ह्यातील आणि कल्याण तालुक्यातील आणि कल्याण शहरातील एक नामवंत संस्था म्हणून शारदा मंदिर संस्थेकडे बघितले जाते. खेड्यापाड्यातून तसेच गरीब घरातून अनेक गावांतून मोठ्या संख्येने विद्यार्थी या संस्थेच्या विविध विभागांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असतात. एक उपक्रमशील संस्था म्हणून या संस्थेकडे बघितले जाते. १६ जून रोजी संपन्न झालेल्या प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमासाठी यावेळी विशेष अतिथी म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव हे उपस्थित होते. याप्रसंगी शारदा मंदिर संस्थेच्या अध्यक्षा तथा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी महापौर वैजयंती गुजर घोलप तसेच शारदा मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष विजयकुमार शिंदे सर, सचिव सौरभदत्त कुलकर्णी, संचालक रमेश मोरे आदी उपस्थित होते. यावेळी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दत्तात्रेय पटवर्धन यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी उपायुक्त संजय जाधव यांचा शारदा मंदिर संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट आणि पेन वाटप करण्यात आले. गुलाब पुष्प देऊन तसेच पुष्पवृष्टी करून नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल