जालना परभणी आणि बुलढाणा जिल्ह्यातुन दुचाक्या चोरणारे दोघे जेरबंद

स्वराज्य वार्ता परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे

दोघा चोरट्याकडुन 12 लाख रुपये किंमतीच्या 14 मोटारसायकली जप्त,दोन्ही चोरटे मंठा पोलीस ठाणे हद्दीतील

परतुर तालुक्यातील वाटुर दक्षेञ परिसरातुन चोरलेली मोटार सायकल मंठा तालुक्यातील आर्डा येथील तरुण घेवुन फिरत असल्याची माहीती परतुर पोलीसांना मिळताच त्यांनी आर्डा येथुन अभिषेक प्रल्हाद धनवडे यास ताब्यात घेवुन तपासणी केली असता त्याच्या कंबरेला खंजर आढळुन आले तसेच या मोटार सायकल संदर्भात चौकशी केली असता त्यांने अमोल गणेश चव्हाण व अन्य एका मिञा सोबत मौजपुरी हद्दीतुन मोटार सायकल चोरल्याची कबुली दिली.पोलीसांनी अमोल चव्हाण ला ताब्यात घेवुन पोलीसी खाक्या दाखवताच या चोरट्यांनी बुलढाणा,परभणी आणि जालना जिल्ह्यातुन 12 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या 14 मोटार सायकली काढुन दिल्यात, या आरोपीता कडुन 13 गुन्हे उघडकीस आले असुन आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे.
सदरची कार्यवाही प्रभारी पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी दादाहरी चौरे,पोलीस निरिक्षक मच्छिंद्र सुरवसे,पोलीस उपनिरिक्षक अमोल रावते,सहायक फौजदार नंदु खंदारे,पोलीस अमंलदार किरण चव्हाण,पोलीस काॅन्स्टेबल दिपक आढे,अच्युत चव्हाण,नरेंद्र चव्हाण,ज्ञानेश्वर वाघ,सुनिल ईलग आणि वंदन पवार यांनी केलीय.

चोरीच्या मोटार सायकली कोणीही खरेदी करु नये-सुरवसे

पोलीसांनी जप्त केलेल्या 13 मोटार सायकली असुन कोणाच्या मोटार सायकली चोरी गेल्या असल्यास त्यांनी परतुर पोलीसांशी संपर्क साधावा,तसेच चोरीच्या मोटार सायकली कोणीही खरैदी करु नये,नसता त्यांच्यावर सुध्दा गुन्हा दाखल केला जाईल असे अवाहन पोलीस निरिक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी केले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल