माजलगाव-तेलगाव रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्याची मागणी

स्वराज्य वार्ता किसन पवार

मुक्या,बहिऱ्या शासनाला जागे करण्यासाठी ५जुनच्या रास्ता रोकोत सहभागी व्हा.. भाई ॲड.नारायण गोले पाटील

माजलगाव-तेलगाव रस्ता गेल्या अनेक महिन्यापासून मृत्यूचा सापळा बनत चालला असून दिवसेंदिवस होणाऱ्या अपघाताची संख्या आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडणारांची संख्या शेकडोवर पोहोचली आहे, याबाबत लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक डोळे झाक करत असून सरकार केवळ दारूचे परवाने देऊन त्यामधून कर वसूल करण्यात व्यस्त आहे काय असा सवाल जनतेला पडला आहे, गेल्या अनेक महिन्यापासून ची तेलगाव-माजलगाव रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी असताना सरकारमधील आमदार मंत्र्यांसह सर्वांनीच उदासीनता दाखवल्यामुळे माजलगाव तेलगाव रस्ता डांबरीकरण होऊ शकला नाही त्याचा परिणाम म्हणून दिवसे दिवस माजलगाव-तेलगाव रस्त्याच्या भेगा मोठ्या होत चालल्या असून त्याची रुंदी दोन ते अडीच फुटापर्यंत पोहोचली आहे आणि रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे, यापूर्वी देखील या रस्त्याच्या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाने आंदोलन करत पाठपुरावा केला परंतु शासनाने केवळ तात्पुरती डागडुजी करून वेळ मारून नेण्याचे काम केले, परंतु थोड्याच दिवसात हा रस्ता पुन्हा पूर्ववत झाला व मृत्यूचा सापळा बनत चालला असताना एक जून रोजी या रस्त्यावर पाच जणांचा मृत्यू झाला तरी देखील या रस्त्याकडे सरकार गांभीर्याने पाहायला तयार नसल्याने सरकारला अजून किती बळी घ्यायचेत हा प्रश्न जनतेला पडला असताना दि.०२जुन रोजी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड. नारायण गोले पाटील यांच्यासह माजलगाव तालुक्यातील विविध संघटना व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांनी उपविभागीय अधिकारी श्री गौरव इंगोले साहेब यांची भेट घेऊन सदरील रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे अन्यथा दिनांक पाच जून रोजी सकाळी दहा वाजता परभणी चौक माजलगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला असून या निवेदनावर नुमान अलि चाऊस, नारायण तौर,सय्यद तोफिक लाला, सुलतान मन्सुरी, राजू कुरेशी, इनामदार ओमर, मोमीन बागवान, गुड्डू खलील, अलीम सय्यद, शोएब चाऊस, नविवोददीन सिद्दिकी, जुनेद आली, राजू कुरेशी जयपाल भिसे भाई मुंजा पांचाळ, अनंतराव जगताप, परमेश्वर डाके आदींच्या स्वाक्षऱ्या असून मुक्या व बहिऱ्या सरकारला जागे करण्यासाठी पाच जून रोजी माजलगाव येथे परभणी चौकात सकाळी दहा वाजता होत असलेल्या रास्ता रोको आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड नारायण गोले पाटील यांच्यासह इतरांनी केले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल