पावसाची उघडीप शेतीच्या मशागतीला वेग

स्वराज्य वार्ता किसन पवार

माजलगाव प्रतिनिधी :दी 01.06.2025.गेल्या पंधरा दिवसापासुन पडत असलेल्या अवकाळी पावसाने दोन दिवसापासुन विश्रांती घेतल्याने शेतकरी खरिप हंगामासाठी शेतीची ट्रॅक्टर यंञाद्वारे शेती मशागतीच्या कामाला वेग दिले आहेत.

मे महिण्याचा बारा चौदा दिवसाचा काळ दररोज वादळी वारा व मेघगर्जेनेसह मोठा पाऊस पडत होता. या पावसामुळे जमीनीत पाणी थांबल्याने शेतीच्या मशागतीत आडचण निर्माण झाली होती. सध्या दोन दिवसापासुन पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी नागरंटी, पाळी, ञी हानून शेतीची बैल जोडी व ट्रंक्टर यंञाच्या साह्याने जलद मशागत करत आहेत. हवामान खात्याने दिं. ३० मे ते १० जुन पंर्यंत पावसाचा खंड पडणार असल्याने शेतकर्‍यांनी शेतातील मशागती करुन घ्याव्यात व पेरणीची घाई करू असे जाहीर केल्याने शेतकरी शेतातील तुराटी,काडी,कचरा वेचुन पेटवुन देत आहेत. तर अवकाळी पावसामुळे शेतात हिरवे गवत उगवल्याने शेतकरी बैलजोडी व ट्रॅक्टर यंञाद्वारे मशागतीच्या कामात व्यस्त झाला आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल