माजलगाव शहर पोलिसांनी केले चोरांना अटक

मुख्य बाजार पेठेत वारंवार दुकाने फोडून चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी दिला दणका

स्वराज्य वार्ता / किसन बी पवार

माजलगाव प्रतिनिधि : मधील खुरशीद रशीद शेख यांचे सिटी नावाचे हॉटेलचे शटर कोणीतरी अज्ञात चोरट्याने फोडून मेडीकल व हॉटेलमधील नगदी 11,000/-रुपये व साहीत्य चोरुन नेले असल्याचे धनंजय दत्तात्रय धपाटे यांचे फिर्याद वरुन पो.स्टे. माजलगांव शहर येथे गु.र.नं. 171/2025 कलम 331 (4), 305 (A) भारतीय न्याय संहीता प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल आहे.

त्यानंतर दि.08/05/2025 रोजी पहाटेच्या सुमारास गोविंद भगवान जाधव रा.शेलापुरी ता. माजलगांव यांचे मेन रोड माजलगांव येथील सिग्नीचर नावाचे कापड दुकानाचे शटर अजात चोरट्यांनी तोडुन दुकानातील नगदी 5300/- रुपये व 15 जिन्स पेंट असा एकूण 24250/-रुपयाचा माल चोरी गेल्याने त्यांचे तक्रारीवरुन पो.स्टे. माजलगांव शहर येथे गु.र.नं. 178/2025 कलम 331 (3), (4), 305 (A) भारतीय न्याय संहीता प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल आहे.
माजलगांव शहरांमधील मेन मार्केटमध्ये दुकाने फोडुन चोऱ्याचे सत्र सुरु झाल्याने व्यापारी वर्गामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु माजलगाव शहर पोलीसांनी तांत्रीकदृष्ट्या कसोशीने तपास करुन मुख्य बाजारपेठेत दुकाने फोडुन चोरी करणारे सराईत गुन्हेगार 1) सुरेश अशोक मोरे वय 30 वर्षे रा. लालबाग जालना 2) विजय कैलास खरे वय 30 वर्षे रा. कन्हैयानगर जालना 3) आमीत नंदलाल धागडीया रा. खरपुडी ता. जि. जालना 4) गोपीसिंग प्रल्हादसिंग टाक रा. गुरुगोविंदसिंध नगर जालना यांना निष्पन् केले असुन सदर गुन्हयामध्ये 1) सुरेश अशोक मोरे 2) विजय कैलास खरे यांना अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन माल नगदी 11,000/-रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच नमुद आरोपीतांकडे कसोशीने तपास चालु असुन इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई नवनित कॉवत, पोलीस अधीक्षक बीड, श्रीमती चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ, पोलीस उपनिरीक्षक के.बी.माकणे, पोहेकों/गणेश नांगरे, पोहेकॉ किशोर जाधव यांनी केली आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल