अवकाळी पावसामुळे भुयारी मार्ग बनला स्विमिंग पूल …

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे

परतुर प्रतिनिधी :- दि 28 गेल्या दोन-तीन दिवसापासून तसेच काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे परतुर शहरातून आष्टी कडे जाण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे .या मार्गात काल झालेल्या पावसामुळे अक्षरशा साडेतीन ते चार फूट पाणी साचले होते या पाण्यामुळे या भुयारी मार्गास स्विमिंग पूल चे स्वरूप पाहण्यास परतूरकरांना मिळाले .पंढरपूर ते शेगाव हा मार्ग परतुर येथून पंढरपूरकडे गेला आहे .परतुर रेल्वे स्टेशन पासून आष्टी कडे जाण्यासाठी व पारडगाव कडे जाण्यासाठी उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे ,तसेच शहरातून आष्टीकडे जाण्यासाठी रेल्वे लोहमार्गाखाली भुयारी मार्ग दुतर्फी तयार करण्यात आला आहे .गेल्या वर्षी देखील या भुयारी मार्गाने पावसाळ्यामध्ये स्विमिंग पूल चे स्वरूप घेतले होते .या भुयारी मार्गातून पाणी बाहेर काढण्यासाठी पश्चिमेस एका विहीर खोदण्यात आली आहे. या भुयारी मार्गाचे पाणी त्या विहिरीत सोडल्या जाते परंतु विहिरीतून कुठल्याही प्रकारचा आऊटलेट नसल्यामुळे हे सर्व पाणी भुयारी मार्गात साचले जाते. भुयारी मार्गाच्या पश्चिमेस डॉक्टर अण्णाभाऊ साठे नगर आहे या भागात देखील भरपूर प्रमाणात पाणी साचले होते व ते पाणी लोकांच्या घरात गेले होते .खरा जर नैसर्गिक इतिहास पाहिला तर असे होते की पश्चिमेकडून येणाऱ्या ओढ्यातून पावसाचे पाणी भुयारी मार्गाच्या पश्चिम दिशेला एक ओढा होता तेवढ्यातून हे पाणी परतुर कडे वाहत होते व गीतांजली हॉटेल समोरील ओढ्यातून हे पाणी पुलाखालून निघून पुढे वाहत होते परंतु जो परतुर मध्ये नैसर्गिक ओढा होता त्या ओढ्याची काही वर्षांपूर्वी नाल्यात रूपांतर झाले, काही वर्षानंतर नाल्याचे नालीत रूपांतर केले.

त्यामुळे महादेव मंदिर चौकातून ह्या नाल्यातील पाणी सर्व मुख्य रस्त्यावर येऊन महादेव मंदिराच्या समोरील रोडवर प्रत्येक वर्षी प्रत्येक मुसळधार पाऊस पडल्यानंतर हे पाणी रोडवर येते .त्यामुळे हे पाणी लोकांच्या घरात दुकानात शिरते. प्रशासनाने याबाबत कुठल्याही प्रकारचे ठोक पाऊल उचलून परतूर मेन रोडच्या पश्चिमेस असणारा ओढा सध्याचा नाला हा रिकामा केला नाही ,त्यावरील अतिक्रमण देखील हटवले नाही, त्यामुळे परतूरकरांना ह्या पाण्याचा सामना करावा लागत आहे .तरी संबंधितांनी याबाबतचे गांभीर्य लक्षात घेऊन नाल्यावरील अतिक्रमण दूर करून नाला साफ करावा. असे जर होत राहिले तर एखाद्यावेळी भुयारी मार्गावरील लोहमार्गाला धोका होऊ शकतो .त्यामुळे एखादी घटना घडू शकते ,तरी संबंधितांनी याकडे वेळीच लक्ष देऊन ह्या समस्येचा बंदोबस्त करावा अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल