स्वराज्य वार्ता अहमद अन्सारी पाथरी
परभणी प्रतिनिधी : “सत्य मांडणं म्हणजे गुन्हा आहे का?” — हा प्रश्न सध्या जालना जिल्ह्यात गाजत आहे. मौजे पुणेगाव येथील गंभीर गुन्ह्यांत अडकलेल्या अरविंद भाऊसाहेब चव्हाण यास जिल्हा प्रशासनाने १ वर्षासाठी हदपार केले. ही वस्तुनिष्ठ माहिती पत्रकार गणेश सातपुते यांनी ‘महाराष्ट्र जीबीएस न्यूज’ या डिजिटल यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध केली. मात्र, सत्याचे धारदार वार सहन न झाल्याने अरविंदचा सख्खा भाऊ, राजू भाऊसाहेब चव्हाण याने चक्क पत्रकारास फोनवरून शिवीगाळ करत, “तुला जीव मारून टाकीन,” अशी धमकी दिली.
“तू लईच पत्रकार झाला का? तुला दाखवू का माझा झटका? तुला मारून टाकीन!”
हे शब्द केवळ रागाचे नाहीत, तर गुन्हेगारी मानसिकतेचा प्रत्यक्ष पुरावा आहेत.
या प्रकारामुळे ना फक्त पत्रकाराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे, तर कायद्याला आणि माध्यमस्वातंत्र्याला आव्हान दिलं गेलं आहे. पत्रकार गणेश सातपुते यांनी तत्काळ तालुका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून, सदर प्रकरणात एन.सी.आर. (Non-Cognizable Report) नोंदवण्यात आली आहे. मात्र केवळ N.C.R. पुरेशी नाही, तर FIR दाखल करून कठोर गुन्हेगारी कारवाई करणे अत्यावश्यक आहे.
हा प्रकार पत्रकारितेच्या गळेकापू गुन्हेगारीचे जिवंत उदाहरण आहे. बातमी न पचणाऱ्या गुन्हेगाऱ्यांच्या नातेवाईकांकडून पत्रकारांना धमकावणे म्हणजे लोकशाहीच्या मूलभूत स्वातंत्र्यावर हल्ला आहे.
पत्रकार संघटनांचा ठाम इशारा आहे: जर प्रशासनाने अशी प्रकरणं दुर्लक्षित केली, तर गुन्हेगारांचे मनोबल वाढेल आणि सत्य मांडणारे पत्रकार धोक्यात येतील.
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी 7218275486
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






