महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा २०१५ ते आजपर्यंत आम्हा दिव्यांगासाठी सेवा देत नसेल तर सेवा हक्क दिनी शासन प्रशासन जागे करण्यासाठी जबाब दो घेरावा आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दिव्यांगानी सहभागी व्हावे असे आव्हान चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांनी केले

नांदेड प्रतिनिधी : शासन प्रशासन दिव्यांगाना सेवा हक्क कायदा २०१५ ते आजपर्यंत आम्हा दिव्यांगासाठी सेवा देत नसेल तर सेवा हक्क दिनी दि.२८ एप्रिल २०२५ रोजी शासन प्रशासन जागे करण्यासाठी जबाब दो घेरावा आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दिव्यांगानी आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांनी केले.

डाकोरे यानी शासन प्रशासन जनतेसाठी असलेला सेवा हक्क दिन,शासन जनतेच्या दारी,शासन दिव्यांगाच्या दारी ,असे अनेक कार्यक्रमाद्वारे उत्सवात साजरा करत आहे.पण खरेच दिनदुबळ्या दिव्यांग वृध्द निराधार, शेतमजूर,शेतकरी आम्हाला हक्क मिळावा म्हणून ते दिनदुबळे शासन दारी निवेदनाद्वारे,मोर्चे,धरने, आंदोलन करून त्यांना हक्क तर मिळतच नाहि पण दिलेल्या निवेदनाचे साधे ऊतर मिळत नाहि.ते वरीष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकारी दोषिवर दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे योग्य ते कार्यवाही का करीत नाहीत.

ज्या दिव्यांगाना चालता येत नाही,दिसत नाही,ऐकु येत नाही बोलता येत नसतानाही शासन, प्रशासन जागे करण्यासाठी अनेक आंदोलने करून मा.जिल्हाअधिकारी नांदेड यांनी आठ वेळा संबंधित अधिकारी व दिव्यांग संघटनेच्या पदाधिकारी सोबत बैठक, सुनावणी घेऊन आदेश, निर्देश देऊन कनिष्ठ अधिकारी एका हि प्रश्नांची सोडवणुक किंव्हा साधे उत्तर कनिष्ठ देत नसतील वरीष्ठाच्या आदेशाचे पालन होत नसल्यामुळे दिव्यांग वृध्द निराधार बांधव न्याय हक्क द्या नसेल तर स्व ईच्छा मरण्याची परवानगीसाठी अनेक वेळा धरने आंदोलन, मतदान कार्ड परत घ्या,असे अनेक आंदोलन करून न्याय हक्क किंव्हा सेवा हक्क मिळत नसेल तर सेवा हक्क दिन साजरा कशासाठी केला जातो.  दिव्यांगाना पारदर्शक कार्यक्षम आणि कालबद्ध पद्धतीने अद्याप सेवा पुरविल्या नसल्याबद्दल दिनांक २८ एप्रिल२०२५ रोजी सेवा हक्क दिनी बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती जिल्हा नांदेड यांनी त्यांच्या निवेदनातील सर्व प्रश्नांसाठी,दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्या सोबत सुनावणी घेऊन आदेश, निर्देश देऊन निर्णय नाही व साधे उत्तर न मिळाल्यामुळे आपण दि.१८मार्चला बैठकीतील प्रोसडिंग मधील प्रश्नांची सोबत जोडत आहे त्यातील एका हि प्रश्नांची दखल किंव्हा साधे उत्तर मिळत नसेल कनिष्ठ आपल्या आदेशाची दखल घेत नसतील तर सेवा हक्क दिन कशासाठी ? याचा प्रशासनाने जबाब दो आंदोलनात जाहीर पाठिंबा व सहभागी व्हावे असे आव्हान दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर, मराठवाडा अध्यक्ष सुधाकरराव पिलगुंडे,मी.सचिव जि.संपर्क प्रमुख नागोराव बंडे पाटील,जिऊप अध्यक्ष राजु भाऊ शेरकुरवार जि.सचिव अनिल रामदिनवार, बालाजी होनपारखे, विठ्ठल बेलकर,दिंगाबर लोणे, उमेश भगत, नामदेव बोडके, मगदुम शेख ऊंद्रीकर, गजानन वंहिदे,सर्व ता.अध्यक्ष सर्व शाखा अध्यक्षानि आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल