मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदी सैय्यद इकबाल सैय्यद अब्बास यांची निवड

स्वराज्य वार्ता / अहमद अन्सारी पाथरी 

बुलडाणा प्रतिनिधी: मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सलीम सारंग यांच्या हस्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा उपाध्यक्ष बुलडाणा

सैय्यद इकबाल सैय्यद अब्बास यांची मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

संघटनेच्या कार्याचा विस्तार आणि उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी सैय्यद इकबाल सैय्यद अब्बास हे निश्चितच जोमाने करतील, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.

याप्रसंगी महेबुब शेख, अकरम तेली, रमीज शेख रहेमान खान पठाण यांसह संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सैय्यद इकबाल सैय्यद अब्बास यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल