पहलगाम घटनेच्या निषेधार्थ आष्टीत सर्व समाज बांधवांचा निषेध मोर्चा

स्वराज्य वार्ता / राम राठोड

आष्टी प्रतिनिधी : कश्मीर मधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ परतूर तालुक्यातील आष्टी येथे शनिवार (ता. २६) दुपारी आष्टी येथील नागरिकांच्या वतीने निषेध शांती मोर्चा काढण्यात आला. कश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप बांधवांना दहशतवाद्यांनी हल्ला करून ठार मारले. तर काही जण जखमी झाले या घटनेनंतर संपूर्ण देशात तीव्र माबी लाट उसळली आहे. सर्वत्र घटनेचा निषेध होत असतांना आष्टी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात दुपारी सर्व समाज बांधवांनी एकत्रित पणे येऊन निषेध मूक मोर्चा काढला.

यावेळी हल्यातील मृत पावलेल्यांना सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या पुढे अशा प्रकारच्या घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे साहेब यांना निवेदना मार्फत करण्यात आली. यावेळी रामप्रसाद थोरात सर,गणेश वैद्य, मधुकर मोरे, कृष्णा टेकाळे, विष्णू काका शहाणे, रामदास सोळंके,कमळाजी आगलावे, अर्जुन थोरात, मंगेश वाघमारे, खंडेराव पाटील, रोहन वाघमारे, शेख अहेमद, मारोती जाधव, डॉ. वाघमारे, शेख मोईन, गणेश वाघमारे, तारेक शेख, रफिक कुरेशी, मोहम्मद जमीनदार, जुनेद पठाण, नारायण वाशिंबे, भागवत जगताप, अल्ताफ कुरेशी, ईश्वर राठी,मधुकर कोल्हे भगवान वाघमारे संदीप मोरे, बजरंग वरकड, खदिर कुरेशी, रमेश थोरात, अनंत आगलावे, मुजीब राज, अनंत बोरकर, अरुण डोईजळकर शौकत सय्यद,आसेफ कच्छी व सर्व समज बांधव उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल